Join us  

लवकरच 'द कपिल शर्मा' शोचा येणार नवीन सीझन, सहभागी होणार नवीन कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 1:55 PM

आता एका अनोख्या आणि हटके पद्धतीने पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी कपिल शर्मा सज्ज झाला आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने 'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून सर्वांना लोटपोट होऊन हसायला भाग पाडले होते. मात्र काही दिवसांसाठी कपिलचा शो ऑफ एअर गेला होता. मात्र आता एका अनोख्या आणि हटके पद्धतीने पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी कपिल शर्मा सज्ज झाला आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या शोमध्ये प्रेक्षकांना नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे नवीन विनोदवीर कोण आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

द कपिल शर्माच्या आधीच्या शोमध्ये कृष्णा अभिषेक, किकू शारदा, भारती सिंह, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि अर्चना पूरन सिंग यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. मात्र आता शोमध्ये आणखी नवीन कलाकारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. कपिल शोमध्ये नवे कलाकार आणि लेखकांना घेणार आहे. 

याबद्दल कपिल शर्माने सांगितले की, मी कपिल शर्मा शोमध्ये नव्या कलाकारांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आणि आनंदी आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या कलाकारांना भेटण्यासाठी मी फार उत्सुक आहे.तर कृष्णा अभिषेकने ईटाइम्सला सांगितले की, द कपिल शर्मा शोमध्ये मे मध्ये कमबॅक करणार आहे. अद्याप तारीख फायनल झालेली नाही. यावेळी शोमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी पहायला मिळणार आहे. शोचा सेटदेखील नवीन असणार आहे.

कपिल शर्मा मागील लॉकडाउनमध्ये आपल्या चाहत्यांना खळखळून हसविले होते. शो बंद झाल्यानंतर चाहते खूप निराश झाले होते. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी  फेब्रुवारीत पुन्हा एकदा पालक झाले आहेत. गिन्नीने मुलाला जन्म दिला आहे. मागील वर्षी कपिलला मुलगी झाली होती. फॅमिलीसोबत वेळ व्यतित करण्यासाठी कपिलने ब्रेक घेतला होता.

टॅग्स :कपिल शर्मा द कपिल शर्मा शो