Join us  

‘आई कुठे काय करते’च्या सेटवर आला होता नवा पाहुणा, पसरलं होतं आनंदी वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 1:42 PM

‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या सेटवर एक नवीन पाहुणा आला होता आणि त्यामुळे सेटवर खेळीमेळीचे वातावरण होते.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे. नुकतेच या मालिकेच्या सेटवर एक नवीन पाहुणा आला होता आणि या पाहुण्याने सेटवरील सर्व कलाकारांचे मन जिंकले आहे. 

आता हा पाहुणा कोण, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर  ‘आई कुठे काय करते’च्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोलेचे बाळ म्हणजेच तिचा कुत्रा बटरस्कॉच आला होता. या छोट्या पाहुण्याने सेटवरील सर्वांचे मन जिंकले. त्यामुळे सेटवर खेळीमेळीचे वातावरण होते. याबद्दल अरूंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले हिने बटरस्कॉचसोबत फोटो शेअर करत लिहिले की, बटरस्कॉच, आमची संवाद लेखिका मुग्धा गोडबोलेचं हे बाळ आज सेटवर आलं आणि वातावरण प्रफुल्लित करून गेलं...!!!

तर अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीनेदेखील बटरस्कॉच सोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत त्याच्याबद्दल भरभरून लिहिले आहे. तसेच त्याला सेटवर आणल्याबद्दल मुग्धाचे आभारदेखील मानले.

 ‘आई कुठे काय करते’ मालिका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत ईशा घरी खोटे बोलून साहिलसोबत पनवेलच्या रिसॉर्टला जाते. साहिल तिथे आपण रूम बूक करून चिल्ल करूया म्हणतो. ते सगळं देविका पाहते आणि अरूंधतीला फोन करून सांगते. अरुंधती तिथे येऊन ईशाच्या कानशीलात लगावते आणि तिला घरी येऊन येते. घरी अनिरुद्धला देखील बोलवून घेतलेले असते. घरी ईशावरून खूप वाद होतात आणि ईशा घरातल्यांना बरेच काही बोलून खोलीत निघून जाते. रात्री ती अरुंधतीशी बोलत नाही. झोपल्यानंतर अचानक अरूंधतीला जाग येते तेव्हा बाजूला ईशा नसते. घरात सगळीकडे ईशाला शोधतात. पण ती कुठेच सापडत नाही. गच्चीवर जातात तेव्हा ईशा उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळते. आता पुढे काय घडणार, हे पाहण्यासाठी मालिकेच्या पुढील भाग पहावे लागेल. 

टॅग्स :स्टार प्रवाह