Join us  

वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणं निया शर्माला पडलं माहागात, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 4:10 PM

नेहमीप्रमाणे निया शर्माने सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. मात्र हेच सेलिब्रेशनचे व्हिडीओ पाहून युजर्स चांगलेच भडकले आहेत.

निया शर्मा नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. टेलिव्हिजन सेन्सेशन निया शर्मावर नेहमीच नेटीझन्स सोशल मीडियावर निशाणा साधत आपला संताप व्यक्त करतात. आपल्या स्टाइलसाठी प्रसिध्द असलेली टीव्ही अभिनेत्री निया शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहे. आताही नेटीझन्सने निया शर्माच्या वाढदिवसाच्याच दिवशीच तिला खडेबोल सुनावले आहे. नुकताच नियाने तिचा  30 वा वाढदिवसांचे जंगी सेलिब्रेशन केले. व्हिडीओत ती केक कट करत असल्याचे पाहायला मिळतंय. नेहमीप्रमाणे नियाने सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. मात्र हेच सेलिब्रेशनचे व्हिडीओ पाहून युजर्स चांगलेच भडकले आहेत. यावेळी नियाला तिच्या ड्रेसिंगमुळे किंवा तिच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी नाही तर केकमुळे चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. केकचे डिझाईन पाहताच तिच्यावर जोरदार टीकेची झोड उठल्याचे पाहायला मिळत आहे. 

केक किती अश्लिल आहे, नियाने सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. ती एक सेलिब्रेटी आहे तिने सोशल मीडियावर काय शेअर करावे काय नको हे तिला कळायला हवे. तिचे असंख्य चाहते आहेत हे सगळं पाहून काय वाटेल याचाही विचार नियाने केला नाही. नियाकडून अशी अपेक्षाच नव्हती. अशा लोकांमुळेच इंडस्ट्री आज बदनाम असल्याचेही युजर्स बोलत आहेत.  इतकेच नाहीतर नियाने व्हिडीओ शेअर करताना लिहीले आहे की, माझ्या आयुष्यातील ३०वर्ष सर्वात घाणेरडे वर्ष आहे. पण तरीही मी खूप खुश आहे. मी खूप आनंदात आहे. 

टीव्हीची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री निया शर्माच्या चाहत्यांसाठी एक गुडन्युज आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, निया 'बिग बॉस 14'चा भाग होणार आहे. नियाला गेल्यावर्षी बिग बॉसचा हिस्सा बनण्यासाठी ऑफर मिळाली होती. मात्र नियाने नकार दिला. रिपोर्टनुसार निया यावर्षी 'बिग बॉस 14'चा भाग होण्यासाठी तयार झाली आहे. शोच्या निर्मात्यांशी मानधन आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा झाली आहे.‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली होती.

2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती. लंडन येथील ’इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50 ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती.निया सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

टॅग्स :निया शर्मा