Join us  

नील भट्ट दिसणार नकारात्मक भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 1:32 PM

एक खरा पुरूष बनण्या विषयी विचारलेल्या काही अवघड प्रश्नांमुळे 8 वर्षांच्या रूपला कठोर बनण्यासाठी आणि सर्वोत्कृष्ट मर्द बनण्यासाठी घरापासून लांब पाठवले गेले होते.

एक खरा पुरूष बनण्या विषयी विचारलेल्या काही अवघड प्रश्नांमुळे 8 वर्षांच्या रूपला कठोर बनण्यासाठी आणि सर्वोत्कृष्ट मर्द बनण्यासाठी घरापासून लांब पाठवले गेले होते. प्रक्षोभक कथा आणि असाधारण परफॉर्मन्समुळे कलर्सच्या रूप -मर्द का नया स्वरूप या अलंकारिक शोने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. आता हा शो 12 वर्षांची झेप घेत आहे. रूपच्या चुलत भावाची- रणवीरची भूमिका करण्यासाठी शोच्या नामवंत कलाकारांमध्ये निष्णात अभिनेता नील भट सामील होत आहे.

तसे पाहता, नील या प्रकल्पाविषयी अतिशय उत्सुक आहे कारण एका दशकानंतर त्याला नकारात्मकतेच्या अनेक छटा असलेली भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. आम्हाला असे कळाले आहे की या भूमिकेची तयारी करण्यासाठी त्याने त्याच्या दिसण्यावर प्रयोग केले आहेत आणि आशा आहे की ते चांगले असतील. शो मधील त्याच्या अपेक्षित प्रवेशा विषयी बोलताना, आनंदित झालेल्या नीलने सांगीतले, “रणवीरची भूमिका साकारणे माझ्यासाठी अतिशय वेगळी गोष्ट आहे कारण ती खूप पैलू असणारी आहे, पण तरीही मी त्याला न्याय देऊ शकेन असा मला विश्वास आहे. कलाकार अतिशय निपुण आहेत आणि मी याआधी चांदणीसोबत काम केलेले आहे, पण मला सेट वर अजून मैत्री वाढवायची आहे. त्याची मला जास्त उत्सुकता आहे.” त्याने पुढे सांगीतले, “ एक अभिनेता म्हणून सर्जनशील समाधान माझ्यासाठी महत्वाचे आहे आणि मला वाटते की ही भूमिका मला शिकण्यात आणि विकसीत होण्यात मदत करेल. रूप सारख्या प्रेरक आणि डोळे उघडणाऱ्या कथेमध्ये सहभागी होण्याचा मला आनंद आहे,”