Join us

नेहा पेंडसेने केली आपल्या आईची इच्छा पूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 14:18 IST

‘मे आय कम इन, मॅडम?’ या मालिकेतील मध्यवर्ती भूमिका साकारणा-या नेहा पेंडसेने नुकतेच आपल्या आईला एक विशेष भेट देऊन ...

‘मे आय कम इन, मॅडम?’ या मालिकेतील मध्यवर्ती भूमिका साकारणा-या नेहा पेंडसेने नुकतेच आपल्या आईला एक विशेष भेट देऊन एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला आहे.ब-याच वर्षापासून  तिच्या आईला पुण्यात एक घर हवे होते. नेहाने तिला पूर्वकल्पना न देता असे एक घर खरेदी करून आपल्या आईला आश्चर्याचा धक्का दिला. “काही दिवसांपूर्वी आम्ही हिंजेवाडी येथे आमच्या नातेवाईकांकडे गेलो होतो. ते ज्या निवासी संकुलात राहात होते, ते माझ्या आईला खूपच आवडले. ही गोष्ट माझ्या लक्षात राहिली. तेव्हा मी त्याच निवासी संकुलात घर घेण्याचा निर्णय घेतला. घर घेतल्यावर मी माझ्या आईला तिथे नेलं, तेव्हा तिच्या चेह-यावरचा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही कमी पडतली.तिच्या चेह-यावरचा आनंद पाहून मला माझ्या मेहनतीचे फळ मिळाल्यासारखे वाटले माझ्या आईने मला घडवण्यासाठी जे काही कष्ट घेतले आहेत त्यापुढे माझी ही भेट काहीच नाहीय.त्यामुळे आज खरच मी खूप खुश आहे.,” असे नेहा पेंडसे म्हणाली. आता ती आपला मुक्काम पुण्याला हलविणार का, असे नेहाला विचारल्यावर ती म्हणाली, “मला पुण्याची हवा खूप आवडते आणि पुणे आणि आसपासच्या परिसरात मराठी चित्रपटांसाठी बरेचदा चित्रीकरण होत असल्याने माझं या शहराशी पूर्वीपासूनच एक वेगळे नातं आहे. पण माझी कर्मभूमी मुंबई असल्याने तिथून कायमचं पुण्याला राहायला येणं अशक्य आहे. हे घर मी बहुदा हॉलिडे हाऊससारखं वापरेन. दोन दिवस आराम करण्यासाठी त्याचा वापर करता येईल.त्यामुळे यापुढे मी मुंबई-पुणे-मुंबई प्रवास करण्यासाठी खूप उत्सुक आहे.”