Join us  

नेहा कक्करचा ऑडीशनचा व्हिडीओ झाला व्हायरल, लूक पाहून चाहतेच झाले आवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 5:48 PM

Neha Kakkar Transformation : या प्रत्येक फोटोमधील नेहाची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. तिचा प्रत्येक अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो.  

''बस नाम ही काफी है'' असे जिच्या बद्दल बोललं जाते ती म्हणजे प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर. सोशल मीडियावर ती सुरुवातीपासून आपले फोटो शेअर करत आली आहे. सुरुवातीचे नेहाचे फोटो आणि आताचे फोटो पाहिले तर तिच्यामध्ये आलेला बदल तुम्हालाही सहज लक्षात येईल. नेहाने तिच्या गायकीने आज सा-यांची मनं जिंकली असली तरीही तिच्या लूकवरही चाहते फिदा होतात. मात्र करिअरच्या सुरुवातीला नेहाचा लूक पाहून तुम्ही थोडं आश्चर्यचकीत व्हाल अतिशय सामान्य लूक असला तरी टॅलेंटमुळे मात्र ती लाखांत एक होती.सोशल मीडियावर तिचा ऑडीशनमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हळहळू तिने स्वतःच्या लकूवर मेहनत घेत ग्लॅमरस लूक मिळवला. तिचा प्रत्येक ग्लॅमरस अवतार चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो. रिअल लाइफमध्ये नेहालाही बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे मॉर्डन रहायला आवडतं. नेहाचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्याचबरोबर जुने फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे नेहा कक्करच्या मेकओव्हरने सध्या सा-याचे लक्ष वेधून घेतले आहे. इन्स्टाग्रामवर नेहाचे हे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच बोल्डही आहेत. या प्रत्येक फोटोमधील नेहाची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. तिचा प्रत्येक अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो.  

नेहा सध्या 'इंडियन आयडल' सिंगिंग रियालिटी शोची जज आहे.विशेष म्हणजे ज्या शोमध्ये ती जज आहे त्याच शोमधून तिने तिच्या करियरची सुरूवात केली होती. जेव्हा नेहा 11वीमध्ये होती. तेव्हा ती कंटेस्टेंट म्हणून या शो मध्ये आली होती. या शोमध्ये ती त्यावेळी यश मिळवू शकली नाही. तिला रिजेक्ट करण्यात आलं होतं. तरीही ती खचली नाही.

 

मोठ्या मेहनतीने तिने स्वतःची यशस्वी गायिका अशी ओळख निर्माण केली. नेहा आज बॉलिवूडच्या टॉप सिंगर्सपैकी एक आहे. ती गाण्याचे 10 ते 15 लाख रुपये ती मानधन घेते. एखाद्या सिनेमात तिला गाणे कंपोज करण्यासाठी घेतले गेले तर ती दोन ते तीन लाख रुपये महिन्याला घेते.

 

4 वर्षांची होती तेव्हापासूनच तिने संगीताचे धडे घेण्यस सुरुवात केली होती. नेहाने तिचा भाऊ टोनी कक्कड आणि बहीण सोनू कक्कड यांच्याकडून प्रशिक्षण घेतली. नेहा सुरुवातीला आपल्या भाऊ बहिणीसोबत जागरणमध्ये गायची. मेहनतीच्या जोरावर आज ती लोकप्रिय गायिकांमध्ये गणली जाते.

टॅग्स :नेहा कक्करइंडियन आयडॉल