Join us  

​नेहा धुपिया साकारणार छोटे मियाँ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2017 9:27 AM

छोट्या पडद्याचे वेध आता सगळ्याच बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना लागले आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार यांसारख्या बॉलिवूडच्या ...

छोट्या पडद्याचे वेध आता सगळ्याच बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना लागले आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार यांसारख्या बॉलिवूडच्या कलाकारांनी मोठ्या पडद्याप्रमाणेच छोट्या पडद्यावरदेखील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जुही चावला, शिल्पा शेट्टी, माधुरी दिक्षित यांसारख्या अभिनेत्रींनीदेखील छोट्या पडद्यावर आपले भाग्य आजमावले आहे. नेहा धुपियाने रोडिज या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री केली होती आणि आता पुन्हा एकदा छोटे मियाँ या कार्यक्रमात ती झळकणार आहे.छोटे मियाँ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या कार्यक्रमाने अनेक बालकलाकार छोट्या पडद्याला आणि बॉलिवूडला मिळवून दिले आहेत. या कार्यक्रमाच्या एका सिझनची विजेती असलेली छोटी गंगूबाई म्हणजेच सलोनी प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे आणि आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी छोटे मियाँचा सिझन लवकरच येणार आहे. या सिझनच्या परीक्षकपदी नेहा धुपियाची वर्णी लागली आहे. नेहाने अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच रोडिजमध्येदेखील ती दिसली होती. नेहा ही तिच्या सेन्स ऑफ ह्युमरसाठी ओळखली जाते. त्यामुळेच तिची छोटे मियाँ या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदाच परीक्षकाच्या खुर्चीत बसण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. याविषयी नेहा सांगते, "मी खऱ्या आयुष्यात कशी आहे हे प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे पाहायला मिळणार आहे. माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना मुले आहेत. त्यांच्यासोबत मी नेहमीच खूप कर्म्फटेबल असते. त्यामुऴे लहान मुलांच्या कार्यक्रमाचा मी भाग बनत असल्याने मला खूप आनंद होत आहे. टीव्हीवर काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या कार्यक्रमाद्वारे लोकांचे आम्ही नक्कीच मनोरंजन करणार आहोत तसेच त्यांना खळखळवून हसवणार आहोत यात काही शंकाच नाही."