अॅनिमेटेड चित्रपटाला नाना पाटेकरांचा आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 23:41 IST
जंगल जंगल बात चली है पता चला है चड्डी पहेनके फूल खिला है फूल खिला है हे गाण्याच्या आठवणी ...
अॅनिमेटेड चित्रपटाला नाना पाटेकरांचा आवाज
जंगल जंगल बात चली है पता चला है चड्डी पहेनके फूल खिला है फूल खिला है हे गाण्याच्या आठवणी पुन्हा ताज्या होणार आहे. कारण काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेल्या मोगली ही अॅनिमिटेड मालिकेचे आता,रूपेरी पडदयावर आगमन होणार आहे. या मोगली मालिकेत शेर खान या पात्राला नाना पाटेकर यांचा आवाज होता, आता पुन्हा नाना पाटेकरच या अॅनिमेशन चित्रपटाच्या माध्यमातून शेर खान या पात्राला आवाज देणार आहे. तर या व्यतिरिक्त इतर पात्रांना ओम पुरी, इरफान खान, प्रियांका चोप्रा हे कलाकारदेखील आवाज देणार आहेत. हा चित्रपट हिंदीमध्येही डब करण्यात येणार आहे. द जंगल बुक असे या अॅनिमेटेड चित्रपटाचे नाव असणार आहे. भारतात ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.