Join us  

नच बलिये या कार्यक्रमात हे सेलिब्रेटी झळकणार आपल्या जोडीदारासोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 1:13 PM

नच बलिये या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमात कोणकोणते सेलिब्रेटी हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

ठळक मुद्देउर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा नच बलियेमध्ये झळकणार आहेत. या कार्यक्रमाच्या नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये आपल्याला उर्वशीला पाहायला मिळत आहे.

नच बलिये हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या या सिझनची निर्मिती सलमान खान करणार आहे. या सिझनचे वैशिष्ट्य म्हणजे या सिझनमध्ये सध्याच्या जोडीदारांसोबत काही एक्स कपलदेखील दिसणार आहेत. या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमात कोणकोणते सेलिब्रेटी हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

नच बलियेच्या यंदाच्या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी हजेरी लावणार याचे वृत्त आज तक वाहिनीने दिले आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा नच बलियेमध्ये झळकणार आहेत. या कार्यक्रमाच्या नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये आपल्याला उर्वशीला पाहायला मिळत आहे. उर्वशीचे लग्न झालेले असून तिला दोन मुले आहेत. या कार्यक्रमात तिचा पार्टनर अनुज असणार आहे.

विशाल आदित्य सिंग आणि मधुरिमा तुली यांनी चंद्रकांता या मालिकेत काम केले होते. या कार्यक्रमातील त्यांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. पण काहीच महिन्यात त्या दोघांचे ब्रेकअप झाले. ते दोघे आता नच बलिये या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.

रोशेल राव आणि किथ सिक्वेरा हे पती-पत्नी असून छोट्या पडद्यावरील क्यूट कपलमध्ये त्यांची गणना होते. ते दोघे बिग बॉसच्या घरात देखील दिसले होते. आता नच बलियेमध्ये त्यांची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

विंदू दारा सिंहचे अभिनेत्री फराहसोबत लग्न झाले होते. काहीच वर्षांनी त्या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आता काही वर्षांपूर्वी त्याने डिनासोबत लग्न केले. ते दोघे नच बलिये या कार्यक्रमात थिरकणार आहेत.

शांतनु महेश्वरी आणि नित्यामी हे दोघे अनेक महिन्यांपासून नात्यात असून ते दोघे नच बलियेच्या यंदाच्या सिझनचा भाग असणार आहेत.

सौरभ जैनने महाभारत या मालिकेत कृष्णाची तर चंद्रगुप्त मौर्य मालिकेत धनानंद ही भूमिका साकारली होती. तो आता नच बलिये या कार्यक्रात त्याची पत्नी रिद्धिमासोबत झळकणार आहे.

डिआयडी फेम फैजल खान आणि त्याची प्रेयसी मुस्कान नच बलिये या कार्यक्रमात थिरकणार आहेत.

कुंडली भाग्य फेम श्रद्धा आर्य तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत या कार्यक्रमात दिसणार आहे.

अनिता हंसनंदानी आणि तिचा नवरा रोहित रेड्डी हे प्रसिद्ध कपल नच बलिये या कार्यक्रमात झळकणार आहे.

गीता फोगट तिचे पती पवन कुमारसोबत या कार्यक्रमात दिसणार असून पवन देखील प्रसिद्ध पेहलवान आहे. 

टॅग्स :नच बलियेसलमान खान