माझा स्वत:चा करमणूक कार्यक्रम असावा, असं माझं स्वप्न होतं- राजीव निगम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 14:39 IST
चैतू लाल या भ्रष्ट राजकीय नेत्याच्या जीवनावर आधारित ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही ‘स्टार प्लस’वरील एक राजकीय विडंबनात्मक ...
माझा स्वत:चा करमणूक कार्यक्रम असावा, असं माझं स्वप्न होतं- राजीव निगम
चैतू लाल या भ्रष्ट राजकीय नेत्याच्या जीवनावर आधारित ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही ‘स्टार प्लस’वरील एक राजकीय विडंबनात्मक मालिका आहे. आपले राजकीय नेते सामान्य माणसाला कशी पोकळ आश्वासने देतात, त्याचे उपहासात्मक चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे.आजवर अनेक राजकीय विडंबन लेखन केलेले विनोदवीर राजीव निगम हे ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पुनरागमन करीत आहेत. या मालिकेबद्दल उत्सुक झालेले निगम म्हणाले, “विविध रिअॅलिटी कार्यक्रमांमध्ये मी बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्या, त्याला आता बरीच वर्षं होतील. प्रेक्षक मला विचारीत की इतर विनोदवीरांप्रमाणे मी माझी स्वत:ची विनोदी मालिका कधी सुरू करणार म्हणून. या विनोदवीरांनी नॉन-फिक्शन क्षेत्रात आपल्या मालिका तयार केल्या असल्याने मी काल्पनिक क्षेत्रात मालिका निर्माण करण्याचा निर्णय घेतला. आता मी माझी स्वत:ची मालिका घेऊन टीव्हीवर येत आहे, हे सांगण्याचा माझा प्रयत्न असून प्रेक्षक माझ्या मालिकेवर प्रेम करतील, अशी आशा आहे.” राजकीय विडंबनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले राजीव निगम हे या मालिकेद्वारे प्रेक्षकांची प्रशंसा मिळविण्यास उत्सुक झाले आहेत. ही नर्म विनोदी मालिका त्यांना नक्कीच गुदगुल्या करील, यात शंका नाही. टीव्हीवरील अनेक कॉमेडी शोजमध्ये राजीव यांनी काम केले असून ते ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ मध्ये भ्रष्ट राजकारणी नेत्याची भूमिका साकारतील. हा शो त्यांच्यावर आणि त्यांच्या परिवारावर आपले लक्ष केंद्रित करेल. टीव्ही आणि चित्रपट उद्योगात विनोदी प्रकारात आपल्या भरपूर काम केलेले दिग्दर्शक अश्विनी धीर यांचा हा शो प्रेक्षकांना गुदगुल्या करेल हे मात्र नक्की.