Join us  

'जिजाजी छत पर है' मालिकेत मुरारीचे होणार अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 10:52 AM

आगामी एपिसोडमध्‍ये प्रेक्षकांना मुरारीचे (अनुप उपाध्‍यय) एका अनोळखी व्‍यक्‍तीकडून अपहरण झाल्‍यानंतर एक योजना पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्दे 'जिजाजी छत पर है'मध्‍ये रोमांचक कथा

सोनी सबवरील मालिका 'जिजाजी छत पर है'ने दर आठवड्याला रोमांचक कथा सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच मालिकेने प्रेक्षकांच्‍या चेहऱ्यावर हास्‍य आणण्‍यासोबतच गंभीर परिस्थितींना मजेशीर ट्विस्‍ट देत प्रत्‍येक पात्राच्‍या विनोदी शैलीला सुरेखरित्‍या सादर केले आहे. आगामी एपिसोडमध्‍ये प्रेक्षकांना मुरारीचे (अनुप उपाध्‍यय) एका अनोळखी व्‍यक्‍तीकडून अपहरण झाल्‍यानंतर एक योजना पाहायला मिळणार आहे.

मुरारीच्‍या कुटुंबाच्‍या नकळत मुरारीप्रमाणे हुबेहूब दिसणारा बनवारी (अनुप उपाध्‍याय) घरामध्‍ये येतो आणि मुरारीप्रमाणे घरात राहायला सुरुवात करतो. काय घडत आहे याबाबत मुरारीच्‍या कुटुंबाला काहीच समजत नाही. मुरारीने एका सुरक्षित जागी लपवून ठेवलेल्‍या मौल्‍यवान वस्‍तू व पैसे चोरण्‍यासाठी आलेला बनवारी त्‍या कुठे आहेत याचा शोध घेण्‍यासाठी कोणतीच कसर सोडत नाही. त्‍याला समजते की, सुरक्षित जागी असलेल्‍या त्‍या तिजोरीमधील वस्‍तू चोरी करण्‍याची सर्वोत्‍तम संधी म्‍हणजे विवाह सोहळा. त्‍याच्‍या योजनेला अंतिम रुप देण्‍यासाठी तो इलायचीची (हिबा नवाब) इच्‍छा नसताना देखील तिच्‍या बिजेंदरसोबत (सौरभ कौशिक) विवाहाची घोषणा करतो. पण इलायचीला कुठेतरी पाणी मुरत असल्‍याचा संशय येतो आणिती त्‍यामागील खरं काय ते शोधून काढण्‍याचे ठरवते. बनवारी मुरारीची आयुष्‍यभराची पुंजी चोरण्‍यामध्‍ये यशस्‍वी होईल का? मुरारीची अपहरणकर्त्‍यांकडून सुटका होईल का? पंचम (निखिल खुराणा) त्‍याच्‍या प्रेयसीची कशाप्रकारे मदत करेल? हे आगामी एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.इलायचीची भूमिका साकारणारी हिबा नवाब म्‍हणाली,'आगामी रोमांचक एपिसोड्स उत्‍साहाने भरलेले आहेत. मालिकेमधील माझे वडिल मुरारीचे अपहरण होते आणि त्‍यांचा दुष्‍ट बहुरूपी संपत्‍तीसाठी घरात येतो. या एपिसोड्समध्‍ये रोमांच, अॅक्‍शन व भरपूर दुष्‍ट योजना असणार आहेत. प्रेक्षकांना आगामी एपिसोड्सचे प्रत्‍येक भाग आवडतील.'

इलायचीचे वडिल मुरारीची भूमिका साकारणारा अनुप उपाध्‍याय म्‍हणाला,'आगामी एपिसोड माझ्या बहुरुप्‍याबाबत आहे, जो मी एका सुरक्षित ठिकाणी ठेवलेले पैसे चोरण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. या एपिसोड्समध्‍ये त्‍याचे पैसे चोरण्‍यासाठीचे सर्व प्रयत्‍न दिसतात. तो चोरी करण्‍यामध्‍ये यशस्‍वी होतो की नाही हे दर्शकांना पाहायला मिळणार आहे.'

टॅग्स :जिजाजी छत पर है