Join us  

मुंबईतील जोरदार पावसाचा फटका टिव्ही इंडस्ट्रीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 1:19 PM

सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे

ठळक मुद्देअनेक मालिकांचे शूटिंग रद्द करण्यात आले

सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर शाळा, कॉलेज, सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर सर्वसामान्यांप्रमाणे पावसाचा फटका सिने इंडस्ट्रीला झालेला दिसतोय. अनेक मालिकांचे शूटिंग रद्द करण्यात आले. कलाकार आणि तंत्रज्ञ सेटवर पोहोचू न शकल्यामुळे मालिकांच्या शूटिंगला याचा फटका चांगलाच बसला आहे. गोरेगावमधील फिल्मसिटीतील बहुतेक मालिकांच्या सेटवरदेखील पाणी साचलं आहे.

'तू अशी जवळी रहा', 'फुलपाखरु', 'वर्तुळ' आणि 'एक घर मांतरलेले' या मालिकांचा आर्वजून उल्लेख करावा लागले. कारण या मालिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. या मालिकांचं शूटिंग पावसामुळे रद्द करण्यात आले आहे. ऐवढेच नाही तर नव्याने सुरु होणाऱ्या मालिकांटं देखील नुकसान झालं आहे. सुफळ ही मालिका लवकरच झी युवावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती मात्र पावसामुळे तिचे आऊटडोअर शूट रखडलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार होणाऱ्या पावसामुळे शूटिंग करता आलं नाही परिणामी याचा ताण मालिकेच्या सेटवर पडला आहे.

हवामान खात्याने पुढील चार दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा आधीच दिला आहे. त्यामुळे आणखी चार दिवस जर असाच पाऊस पडला तर त्याचा सर्वात जास्त फटका टीव्ही इंडस्ट्रिला होईल यात काहीच शंका नाही.  

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेट