Join us  

मी असतो तर एक मुस्काटात दिली असती...! मुकेश खन्ना पुन्हा भडकले, आता ‘न्यू ईअर’चे निमित्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 3:06 PM

म्हणाले, हे नवे वर्ष आपले नाहीच, हे पाश्चातांचे नवे वर्ष...

ठळक मुद्देसध्या त्यांच्या या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्यांची भूमिका योग्य ठरवली आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना सोशल मीडियावर कधी नव्हे इतके अ‍ॅक्टिव्ह झालेले दिसत आहेत. अनेक मुद्यांवर ते आपले मत व्यक्त करताना दिसतात. सध्या हेच मुकेश खन्ना जाम संतापले आहेत. होय, कुल्लू -मनालीच्या मार्गावर पर्यटकांच्या हजारो गाड्यांची रांग आणि जॅममध्ये अडकलेल्या  पर्यटकांनी केलेला डान्स पाहून ते भडकले. सोशल मीडियावर त्यांनी याबद्दल एक संतप्त पोस्ट शेअर केली. कोरोना काळ आहे आणि यातही लोक नवे वर्ष साजरे करत आहेत. हे आपले नवे वर्ष नसूनही इतका जल्लोष? विनाश काले विपरीत बुद्धी म्हणतात ते यालाच, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 

काय म्हणाले मुकेश खन्ना...

ना हे नवीन वर्ष आपले आहे, ना ही खांद्याला खांदा लावून नाचण्याची वेळ आहे. कोरोना काळातही कुल्लू मनालीच्या मार्गावर हजारो गाड्यांची गर्दी का? गाडीमधून उतरून नाचण्याची उच्छाद का? विनाशकाले विपरीत बुद्धी याचे यापेक्षा अधिक चांगले उदाहरण कोणते असू शकते. काही दिवसांपूर्वी अहमदाबादेत बस स्टॉपवरच्या गर्दीतील एक जण टीव्ही कॅमे-यावर कोरोनाची खिल्ली उडवत होता. क्या है तुम्हारा कोरोना, मैं तुम्हारे कोरोना के साथ बैठ सकता हू, सो भर सकता हू, खाना भी खा सकता हूं, असे तो म्हणत होता. आता या मंदबुद्धीला काय म्हणणार? हेच लोक नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करण्याची हिंमत करत असून कोरोनाला निमंत्रण देत आहे. सरकारही गप्प आहे. मी असतो तर त्या अहमदाबादेतील महामूर्खाच्या सणसणीत थोबाडीत हाणून त्याला सोशल डिस्टन्सिंग शिकवले असते, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :मुकेश खन्ना