Join us  

Tunisha Sharma Death : दोष तुनिषाचा नाही, सगळ्यात मोठा दोष तिच्या...., मुकेश खन्नांनी पालकांवर काढली भडास...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 4:55 PM

Mukesh Khanna On Tunisha Sharma Suicide Case : शक्तिमान आणि भीष्म पितामह सारख्या गाजलेल्या भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी तुनिषा शर्मा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Mukesh Khanna On Tunisha Sharma Suicide Case : शक्तिमान आणि भीष्म पितामह सारख्या गाजलेल्या भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी तुनिषा शर्मा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.  टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने   मेकअपरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. बॉयफ्रेंड व अभिनेता शीझान खानशी तिचं ब्रेकअप झाल्यामुळे तुनिषाने आत्महत्या केल्याचं मानलं जात आहे. अशात आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या युट्युब चॅनलवर मुकेश खन्ना यांनी 15 मिनिटांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी तुनिषाच्या पालकांसोबतच अन्य मुलींच्या कुटुंबीयांनाही सल्ला दिला आहे.  सगळेच तुनिषासाठी अस्वस्थ आहेत. पण यामध्ये सगळ्यात मोठी चूक त्या मुलीच्या पालकांची आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले मुकेश खन्ना?तुनिषा आत्महत्या प्रकरण हे लव्ह जिहाद प्रकरण नाहीये. प्रत्येक खान असं काम करेलच असं नाही. अशा घटना घडत आहेत कारण आहे नाजूक वयामुळे. तुनिषा गेली आणि आता तिच्या बॉयफ्रेन्डवर आरोप होत आहेत. त्याला अटकही झाली आहे. पण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन बोलण्याची कुणालाही गरज वाटत नाही. सगळ्यात मोठा दोष पालकांचा आहे. विशेषत: मुलींच्या पालकांचा. मुलं स्वत:ला सांभाळू शकतात. पण मुली खूप भावनिक असतात. काही मुली आपल्या बॉयफ्रेंडला देव मानतात. पण जेव्हा त्यांना कळतं की आपला जोडीदार आपली फसवणूक करत आहे तेव्हा विचार करा त्यांची काय अवस्था होते. तुनिषाचं मन दुखावलं आणि तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. पालकांनी मुलांना एकटं सोडू नये. अन्यथा प्रत्येक मुलीची अशीच अवस्था होऊ शकते. तुनिषाचे आई-वडील तिच्याबरोबर असते तर अशी घटना घडली नसती. पालकांनी प्रत्येक महिन्यात आपल्या मुलांना भेटणं गरजेचं आहे.

पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण नातं निर्माण केलं पाहिजे. नैराश्याच्या 1-2 मिनिटांच्या त्या क्षणात आत्महत्येसारखं पाऊल उचललं जातं. त्यावेळी एखादा मित्र, भाऊ, बहिण, आई, बाबा हजर असते तर कदाचित तुनिषा वाचली असती. पालक आपल्या मुलींना टॅलेंटेड समजून सॅटेलाईट इंडस्ट्रीत पाठवतात. पण त्यांना एकटं सोडता कामा नये..., असं मुकेश खन्ना यांनी व्हिडीओत म्हटलं आहे.

टॅग्स :मुकेश खन्नातुनिशा शर्माटिव्ही कलाकार