Join us

आई, मला तो अडीच वर्षापासून छळतोय...; वैशाली ठक्करच्या मृत्यूपूर्वीचा झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 09:05 IST

वैशालीने लग्नाच्या ४ दिवस आधी आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीला हे टोकाचं पाऊल उचलण्यासाठी तिचा एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानी हे कारणीभूत असल्याचं सांगितले जात आहे

नवी दिल्ली - अभिनेत्री वैशाली ठक्कर हिच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आपली लाडकी लेक आता या जगात नाही यावर अद्याप आई वडिलांना विश्वासच नाही. वैशालीच्या घरी लग्नाची लगबग सुरू होती. परंतु आज घरात शोककळा पसरली आहे. वैशालीच्या निधनानं आई वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वैशालीला न्याय मिळावा अशीच तिच्या घरच्यांची मागणी आहे. 

राहुलमुळे वैशालीनं जीव दिलावैशालीने लग्नाच्या ४ दिवस आधी आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीला हे टोकाचं पाऊल उचलण्यासाठी तिचा एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानी हे कारणीभूत असल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे मुलीचा छळ करणाऱ्या राहुल आणि त्याची पत्नी या दोघांना कठोर शिक्षा व्हावी अशी कुटुंबाची इच्छा आहे. कारण राहुलची पत्नी दिशाही त्याच्यासोबत आहे. (Vaishali Takkar Suicide Case)

वैशालीच्या आईनं सांगितले सत्यवैशाली ठक्करने राहुलबाबत तिच्या आईलाही सांगितले होते. तो खूप वाईट आहे असं ती म्हणाली होती. मीडियात दिलेल्या मुलाखतीत वैशालीच्या आईने राहुलबाबतचे अनेक खुलासे केले. आई, तो मला अडीच वर्षापासून त्रास देतोय. मला हे सांगायचं नव्हते कारण तू हार्ट पेशंट आहे. मला वाटलं मी सांभाळून घेईन परंतु आता मी वैतागली आहे. मला या त्रासातून मुक्त कर असं वैशालीने आईला म्हटलं होते. तो डर या सिनेमातील शाहरुख खानच्या भूमिकेसारखाच आहे. बाहेरून दिसायला स्वीट परंतु आतून भयंकर. त्याला कुणी ओळखत नाही. केवळ मीच त्याला ओळखते असंही वैशालीनं म्हटलं होते. 

त्याचसोबत लग्नाच्या काही दिवसआधी वैशालीने मितेशसोबत फोटो शेअर केला होता. तेव्हा राहुलला मितेशबाबत माहिती पडले. त्यानंतर राहुलने मितेशला सोशल मीडियात मेसेज केला होता. मितेश कुमार गौर आणि वैशालीचा साखरपुडा झाला होता. परंतु अखेरच्या काळात तो विचलित झाला. मितेशला लग्नाच्या विधीसाठी इंदूरला यायचं होतं परंतु तो बहाणा बनवू लागला. दुसऱ्यांदा राहुलमुळे वैशालीचं लग्न तुटलं होते. राहुलच्या या करकुतीमुळे वैशाली त्रस्त झाली होती. त्याच कारणाने तिने या जगाचा निरोप घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला.