Join us  

'दिव्य दृष्टी'मध्ये मोनालिसा आणि संगीता घोष एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 7:15 AM

'दिव्य दृष्टी' या मालिकेतील संगीता घोष या अभिनेत्रीच्या पिशाचिनीच्या आकर्षक आणि मादक रूपाने प्रेक्षकांना मोहित केले आहे.

स्टार प्लस वाहिनीवरील 'दिव्य दृष्टी' या मालिकेतील संगीता घोष या अभिनेत्रीच्या पिशाचिनीच्या आकर्षक आणि मादक रूपाने प्रेक्षकांना मोहित केले आहे. दिव्या आणि दृष्टी या जुळ्या बहिणींकडे असलेली खास शक्ती प्राप्त करण्यासाठी त्यांच्या मागे लागलेल्या या खलनायिकेला आता आपला हा हेतू सिद्धीस नेण्यासाठी एक जोडीदार मिळाला आहे.

आधीच खास शक्ती अंगी असलेली ही शक्तिशाली पिशाचिनी तिला मिळालेल्या दोन जादूच्या खड्यांमुळे अधिकच शक्तिशाली बनलेली असते. तिला आता स्टार प्लसवरील 'नजर' या मालिकेतील मोहना या दुसऱ्या एका शक्तिशाली हडळीची (डायन) साथ मिळते. मोहना ही एक दुष्टप्रवृत्तीची आणि तितकीच धोकादायक हडळ असते. मोहनाची सारी शक्ती तिच्या लांबलचक वेणीत एकवटलेली असते आणि तिच्या मार्गात येणार्‍्या कोणत्याही अडथळ्याला ती या वेणीच्या फटकाऱ्यासरशी दूर करीत असते. 

आता मोहना या दुसऱ्या दुष्ट शक्तीबरोबर केलेल्या हातमिळवणीमुळे दिव्या आणि दृष्टी यांच्याकडील खास शक्ती प्राप्त करण्याचा पिशाचिनीचा बेत जवळपास यशस्वी होणार असतो. या दोन बहिणींना या दोन दुष्ट शक्तींच्या तावडीतून सुटण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. या दोन दुष्ट शक्ती एकत्र येऊन या जुळ्या बहिणींकडील खास शक्ती कशी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, ते पाहणे प्रेक्षकांना एका वेगळ्याच थराराचा अनुभव देईल. दिव्या आणि दृष्टी यांच्याकडील शक्ती मिळविण्यासाठी या दोन दुष्ट शक्ती कसा संघर्ष करतात, ते पाहण्यास सिद्ध व्हा.

टॅग्स :मोनालिसासंगीता घोषदिव्य दृष्टी