Join us

पुरुषांनाही लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं- प्रियांका चोप्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 15:08 IST

‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ या अभिनयातील गुणवान कलाकारांचा शोध घेणाऱ्या आगामी भव्य कार्यक्रमाच्या पहिल्याच भागाचे चित्रीकरण नुकतेच मुंबईत पार पडले. ...

‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ या अभिनयातील गुणवान कलाकारांचा शोध घेणाऱ्या आगामी भव्य कार्यक्रमाच्या पहिल्याच भागाचे चित्रीकरण नुकतेच मुंबईत पार पडले. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रस्थापित अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक यांच्याच नातेवाईकांना अभिनयाची संधी मिळते, या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हा कार्यक्रम तयार केला जात असून त्यात सामान्य लोकांतील तरूण गुणवान अभिनेता आणि अभिनेत्रींचा शोध घेतला जाणार आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभी त्याचे ‘स्टार प्लस’वरून प्रसारण केले जाईल.नामवंत निर्माता करण जोहर आणि प्रसिध्द दिग्दर्शक रोहित शेट्टी हे दोनजण या कार्यक्रमाचे जज्ज म्हणून काम बघणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात विशेष अतिथी जज्ज म्हणून जागतिक चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटविलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीसुध्दा सहभागी होणार आहे. प्रियांकाने सध्या हॉलीवूडमधील प्रकल्पांमध्ये भूमिका करण्याचा सपाटा लावल्याने ती बॉलिवूडमधून गायब झाली आहे. परंतु देशातील सामान्य माणसांतील होतकरू कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ती या कार्यक्रमात सहभागी झाली आहे.हिंदी चित्रपटसृष्टीत तरुण होतकरू अभिनेत्रींची लैंगिक सतावणूक व पिळवणूक केली जाते का, या प्रश्नावर प्रियांका उद्गारली, “मुलीच नव्हे, तर पुरुषांनाही लैंगिक सतावणुकीला सामोरं जावं लागतं!” प्रियांकाच्या या वक्तव्याला दुजोरा देताना या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक ऋत्विक धनजानी म्हणाला, “चित्रपट क्षेत्रात खालच्या स्तरावरील काही लोक या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवख्या तरूणांच्या असहाय्यतेचा फायदा उठविण्याचा प्रयत्न करतात. बडे, प्रस्थापित दिग्दर्शक आणि निर्माते असं कधीच करीत नाहीत. या क्षेत्रात केवळ उत्तम आणि सुत्शील लोकांबरोबरच काम करण्याची संधी लाभली, हे माझं सुदैव आहे.”प्रियांकाचे भाव सध्या चांगलेच वधारले आहेत. इंटरनॅशनल स्टार म्हणून ओळखली जात असल्याने तिची प्रचंड डिमांड आहे. त्यामुळेच आयोजकांनी तिच्या टीमसोबत फार मोल-भाव करण्याचा प्रश्नच नव्हता. अवार्ड शोमध्ये प्रियांकाचा परफॉर्मन्स हायलाईट करण्याचा आयोजकांचा इरादा आहे. यावेळी पीसी तिच्याच सुपरहिट गाण्यांवर थिरकताना दिसेल.