Join us  

मिलिंद सोमण- अंकिता V/s 'तुला पाहते रे'चे मिम्स आणि विनोद जबरदस्त ट्रेंडिंग, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 12:08 PM

तुर्तास मिलिंद सोमण पत्नी अंकिता कंवर आणि 'तुला पाहेत रे' मालिकेतूल सुबोध भावे आणि गायत्री दातार यांनी साकारलेल्या भूमिकांचीतुलना असणा-या अशाप्रकारचे मिम्स सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.पाहूया सोशल मीडियावरील हेच धम्माल मिम्स आणि विनोद.

छोट्या पडद्यावर 'तुला पाहते रे' ही मालिका सुरू झाल्यापासून त्याची तुलना मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर यांच्याशी होत आहे. एका अजब कपल गजब गोष्ट म्हणत यादोघांमध्ये आणि 'तुला पाहते रे' मालिकेत काय साम्य आहे याचीही जोरदार चर्चा रंगते आहे.

सोशल मीडियावर असे अनेक मिम्स आणि विनोदांचा भडिमार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ५२ वर्षाचा मिलिंद तर अंकिताचे वय २७ वर्षे. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही अखेर हे कपल रेशीमगाठीत अडकले.

त्यामुळे त्यांच्या प्रेमाची गोष्ट जाणून घेण्यासाठी आणि त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी रसिक उत्सुक असतात. तर दुसरी कडे 'तुला पाहते रे' मालिकेतही सुबोध भावेने साकारलेला विक्रम सरंजामे आणि गायत्री दातारने ईशा ही भूमिका साकरली आहे.

या दोघांमध्ये मिलिंद आणि अंकिता या कपलप्रमाणे वयात खूप अंतर असल्याचे दाखवण्यात आले आहे. ''वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी 'तुला पाहते रे' मालिकेत दाखवण्यात आली आहे. तुर्तास दोघांची तुलना असणा-या अशाप्रकारचे मिम्स सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. पाहूया सोशल मीडियावरील हेच धम्माल मिम्स आणि विनोद.

 

काही महिन्यांपूर्वी दोघंही लग्नबंधनात अडकले आहेत. ५२ वर्षाचा मिलिंद तर अंकिताचे वय २७ वर्षे. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही अखेर हे कपल रेशीमगाठीत अडकले. त्यामुळे त्यांच्या प्रेमाची गोष्ट जाणून घेण्यासाठी आणि त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी रसिक उत्सुक असतात.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं एक कपल अखेर लग्नबंधनात अडकलं आहे. हे लग्न थोडं हटके होतं. कारण नव-या मुलाचं वय आहे ५२ वर्षे तर नवरीचे वय २७ वर्षे. म्हणजे दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही अखेर हे कपल रेशीमगाठीत अडकले आहे.

हे कपल म्हणजे मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर. अलिबागमध्ये मिलिंद आणि अंकिताचा विवाहसोहळा कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत पार पडला होता.

 

 

 

टॅग्स :मिलिंद सोमणतुला पाहते रेसुबोध भावे