Join us

अनिता दातेच्या चाहत्यांसाठी खुशखबर, आता दिसणार या प्रसिद्ध कार्यक्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 11:36 IST

अनिता दातेच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. ती आता लवकरच छोट्या पडद्यावर परतत असून झी मराठीवरील एका प्रसिद्ध कार्यक्रमात झळकणार आहे.

ठळक मुद्देअनिता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडिओत आपल्याला गायत्री दातारसोबत तिला पाहायला मिळत आहे.

माझ्या नवऱ्याची बायको’ या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील राधिकाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या भूमिकेत आपल्याला अनिता दातेला पाहायला मिळाले होते. या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. ही मालिका संपल्यानंतर तुमची लाडकी अनिता आता काय करतेय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

अनिता दातेच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. ती आता लवकरच छोट्या पडद्यावर परतत असून झी मराठीवरील एका प्रसिद्ध कार्यक्रमात झळकणार आहे. अनिता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात झळकणार असून तिचे एक वेगळे रूप तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 

अनिता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडिओत आपल्याला गायत्री दातारसोबत तिला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या तालमीच्या वेळेसचा आहे. 

‘चला हवा येऊ द्या’ मध्ये भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपूरे, अंकूर वाढवे यांच्या व्यतिरिक्त आजवर शिवानी बावकर, गायत्री दातार, स्नेहा शिदम या अभिनेत्री विनोद करताना दिसल्या आहेत.  

टॅग्स :अनिता दातेमाझ्या नवऱ्याची बायकोचला हवा येऊ द्या