Join us  

या खास फॅनला मिळाली मालिकेत काम करण्याची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 3:01 PM

तिने सर्व कलाकारांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली. जेव्हा ईमेल मिळाला तेव्हा त्यांनी तिला आणि तिच्या परिवाराला मुंबईमध्ये एक अख्खा दिवस तिच्या लाडक्या कलाकारांसोबत वेळ घालवण्यासाठी बोलावले होते.

एखाद्या शोचे यश हे नेहमी त्यांच्या चाहत्यांच्या प्रेमावरून ठरत असते आणि जेव्हा लिखित पत्रव्यवहारातून प्रेमाचा दाखला मिळतो,तेव्हा आनंदाला मर्यादाच नसते. छोट्या पडद्यावरील शो मायावी मलिंगसाठीही असाच एक फॅनने पत्र मेल केले होते.दिल्लीतील एक दिव्यांग  काजल अगरवालने ह्या शो आणि व्यक्तिरेखांबद्दल तिला वाटणारे प्रेम एका ईमेलच्या माध्यमातून कळवले. आणि आश्चर्य म्हणजे वाहिनीने तिला सेटवर बोलावून तिला  ह्या शो चा हिस्सा बनवण्याचे ठरवले.

काजल अगरवाल दिल्लीतील पांडे नगर येथे राहते. तिने हल्लीचे मायावी मलिंग मालिकेबद्दल तिला वाटणारे प्रेम व्यक्त करणारा ईमेल वाहिनीला पाठवला. त्यात तिने सर्व कलाकारांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली. जेव्हा वाहिनीला हा ईमेल मिळाला तेव्हा त्यांनी तिला आणि तिच्या परिवाराला मुंबईमध्ये एक अख्खा दिवस तिच्या लाडक्या कलाऱ्यांसोबत वेळ घालवण्यासाठी तिला बोलावण्यात आले.एवढेच नाही तर वाहिनीने तिचे ह्या तिच्या आवडत्या कलाकारांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्याचे स्वप्नही पूर्ण केले. आगामी भागांमध्ये ती अतिथी कलाकार म्हणून झळकणार आहे. याबद्दल अतिशय आनंदात असलेली काजल म्हणाली, “माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. मी दिल्लीच्या बाहेर कधीच गेले नाहीये. या मालिकेच्या टीमचे मी आभार मानते त्यांच्यामुळे मी मुंबईला येऊन मायावी मलिंगच्या सेटवर माझ्या आवडत्या कलाकारांना भेटू शकले. इतकेच नाहीतर ह्या शोचा एक भाग बनता आले हर्षद अरोरा सोबत काम करण्याचे माझे स्वप्न होते.तेही पूर्ण झाले, माझा आनंद मी शब्दांत मांडू शकत नाही. ह्या आठवणी मला आयुष्यभर प्रेरणादायी ठरतील असे तिने सांगितले.