मर्दानी फेम अवनीत कौरची चंद्र नंदिनी मालिकेत होणार एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 14:52 IST
चंद्र नंदिनी ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून या मालिकेत आता सिद्धार्थ निगमची एंट्री होणार आहे. सिद्धार्थ या ...
मर्दानी फेम अवनीत कौरची चंद्र नंदिनी मालिकेत होणार एंट्री
चंद्र नंदिनी ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून या मालिकेत आता सिद्धार्थ निगमची एंट्री होणार आहे. सिद्धार्थ या मालिकेत चंद्र आणि नंदिनीचा मुलगा बिंदूसारची भूमिका साकारणार आहे. त्याच्यानंतर मालिकेत आणखी एक एंट्री होणार आहे. आता या मालिकेत अवनीत कौर झळकणार आहे. ती बिंदूसारच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. अवनीतने लहान असताना डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर या कार्यक्रमात काम केले होते. या कार्यक्रमात पहिल्या तीन स्पर्धकांमध्ये तिने मजल मारली होती. या कार्यक्रमामुळे तिला अभिनयाच्या अनेक ऑफर्स मिळाल्या. तिने मर्दानी या चित्रपटात तर सावित्री, मेरी माँ, एक मुठ्ठी आसमान, हमारी सिस्टर दिदि यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. याविषयी अवनीत सांगते, या मालिकेत मी चारुमतीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेसाठी मी ऑडिशन दिले, त्यावेळी या मालिकेसाठी माझी निवड होईल असे मला वाटले नव्हते. पण मालिकेच्या टीममधील मंडळींना माझे ऑडिशन आवडले आणि माझी या भूमिकेसाठी निवड झाली. मी या मालिकेचे चित्रीकरण करायला सुरुवात केली असून सिद्धार्थ खूप चांगला आहे. त्याच्यासोबत काम करताना खूप मजा येत आहे. चंद्र नंदिनी या मालिकेत श्वेता बासू आणि रजत टोकस प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा सुरुवातीला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण या मालिकेची लोकप्रियता कमी झाली असल्याने या या मालिकेच्या निर्मात्यांनी लीप घेण्याचे ठरवले आहे. सिद्धार्थ निगम खूप प्रसिद्ध असल्याने त्याच्या एंट्रीनंतर मालिकेच्या टीआरपीमध्ये नक्कीच फरक पडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. लीपनंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. लीपनंतर चंद्र आणि नंदिनी यांच्यात दुरावा आल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चंद्र आणि नंदिनी यांच्यात खूप भांडणं होणार असून ते एकमेकांचे शत्रू होणार आहेत. तसेच चंद्र अतिशय क्रूर झाल्याचे दाखवण्यात येणार आहे.Also Read : चक्रवर्ती अशोक सम्राट फेम सिद्धार्थ निगम दिसणार चंद्र नंदिनीमध्ये