Join us  

गजर तुझा मोरया! रोहित राऊतचं नवं गाणं श्रोत्यांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 5:34 PM

Rohit raut : महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना, महापूर या संकटामध्ये सर्वसामान्यांचे कशा प्रकारे हाल झाले हे या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचित्रपट,मालिका,अल्बमसाठी पार्श्वगायन केलेल्या रोहितचं एक नवंकोरं गाणं श्रोत्यांच्या भेटीला

‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला गायक म्हणजे रोहित राऊत. आपल्या सुमधूर आवाजाने कानसेनांना तृप्त करणारा रोहित आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. अनेक चित्रपट,मालिका, अल्बमसाठी पार्श्वगायन केलेल्या रोहितचं एक नवंकोरं गाणं श्रोत्यांच्या भेटीला आलं आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपला असतानाच रोहितचं गजर तुझा मोरया हे नवीन गाणं रिलीज झालं आहे. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रावर कोरोना, महापूर अशी अनेक संकट आली. या संकटामध्ये सर्वसामान्यांचे कशा प्रकारे हाल झाले हे या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अन्वीच्या व्हिडीओवर भारतीय जवानांची कमेंट; अंशुमनच्या डोळ्यात तरळलं पाणी 

"कुणाल-करणच्या संगीतामध्ये एक जादू आहे. गजर तुझा मोरया तुम्हांला भक्तीरसात लीन करेल, याची मला खात्री आहे. नादखुळा म्युझिकसोबत माझं हे पहिलं गाणं आहे. या अगोदरची नादखुळा म्युझिकची दोन्ही गाणी कानसेनांच्या पसंतीस पडली आहेत. त्यामुळे हे ही गाणे सर्वांना आवडेल, अशी मला आशा आहे,” असं रोहित म्हणाला.

”महापूरातल्या अनेक कुटूंबांची प्रातिनिधिक कथा गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणे घराघरात गणेश आराधनेत ऐकलं जाईल, अशी आशा आहे," असं मत सचिन कांबळे यांनी व्यक्त केलं.

दरम्यान,सचिन कांबळे दिग्दर्शित या गाण्याची निर्मिती निखील नमित आणि प्रशांत नाकती यांनी केली आहे. तर संगीत दिग्दर्शक कुणाल-करण यांचं आहे. कुणाल-करण या जोडीने आजवर अनेक टीव्ही मालिकांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :रोहित राऊतसेलिब्रिटीगणेशोत्सव