Join us  

मुग्धा वैशंपायनची मोठी बहीण लग्नबंधनात अडकली, Photos व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 2:23 PM

मुग्धा वैशंपायनच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरु होती.

सा रे ग म प लिटिल चॅम्प्स फेम गायिका मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) यांनी काही महिन्यांपूर्वीच प्रेमाची कबुली दिली. यानंतर दोघांनी साखरपुडाही केला. प्रथमेश-मुग्धा कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र त्याआधी मुग्धाच्या मोठ्या बहिणीने लग्नगाठ बांधली आहे. मृदुल वैशंपायन ही मुग्धाची मोठी बहीण असून तिने विश्वजीत जोगळेकरसोबत लग्न केले आहे. 

मुग्धा वैशंपायनच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरु होती. तिची मोठी बहीण मृदुल आज लग्नबंधनात अडकली. तिच्या मेहंदी आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मुग्धानेही ग्रहमखाचे फोटो पोस्ट केले होते. आज मृदुलच्या विवाहाचे फोटो समोर आले आहेत. लाल रंगाच्या साडीत मृदुल खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रेने सोशल मीडियावर विवाहसोहळ्याचा एक फोटो शेअर केला आहे. 

अलिबागचे प्रसिद्ध जोगळेकर फार्मचे विश्वजीत जोगळेकरसोबत मृदुलचा विवाहसोहळा पार पडला आहे. वैशंपायन आणि जोगळेकर कुटुंबाची आधीपासून ओळख आहे. आता या ओळखीचं नात्यात रुपांतर झालं आहे. तर दुसरीकडे मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाची तारीख कधी समोर येतेय याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय.

टॅग्स :सा रे ग म पसेलिब्रिटीलग्न