Join us  

आता घरबसल्या होणार मालिकाचं शूटिंग, टीव्ही इंडस्ट्रीत मराठी मालिका रचणार नवा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 10:54 AM

सर्व कलाकार आपल्या घरात बसूनच शूट करणार आहेत.

कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांपासून कलाकार सध्या घरात बसून आहे. या गोष्टीला आता जवळपास दोन महिने होतील. कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतायेत. सोशल मीडियावर ते व्हिडीओ किंवा लाईव्ह चॉटच्या माध्यमातून फॅन्सशी कनेक्ट राहतायेत.  

शूटिंगल जुलै महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. जुलै महिन्यात शूटिंगला जरी परवानगी मिळाली तर शूटिंगच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी लागणार आहे.

एबीपी माझाच्या रिपोर्टनुसार कोरोनामुळे सगळ्यांचं जनजीवन विस्कळित झाले आहे अशात सर्व कलाकार घरी बसून आहेत. मराठी टीव्ही इंडस्ट्रीत यावरच एक मालिका येते आहे. विशेष म्हणजे मालिकेतील सर्व कलाकार आपल्या घरात बसूनच शूट करणार आहेत. आठशे खिडक्या नऊशे दारं असे या मालिकेचे नाव असल्याची माहिती आहे. या मालिकेचे दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले करणार आहेत.

तर अभिनेते मंगेश कदम आणि लीना भागवत , समीर चौघुले, विशाखा सुभेदार, सखी गोखले, सुव्रत जोशी, आनंद इंगळे हे या मालिकेत काम करणार आहे. जर हे खरंच शक्य झाले तर घरात टीव्ही इंडस्ट्रीच्या इतिहासात या मालिकेची नोंद घेतली जाईल. 

टॅग्स :सखी गोखले