Join us  

तावडे बहिणींचं डोंबिवलीत आहे 'खुशबू गिफ्ट शॉप', दुकानात लावलेत पोस्टर्स; तितीक्षा म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 2:32 PM

दुकानात येणाऱ्या ग्राहक पोस्टर्स का लावलेत विचारतात. तितीक्षा म्हणाली...

मराठी मालिका विश्वातील दोन बहिणींची जोडी सध्या टीव्हीवर हिट आहे. ही जोडी म्हणजे खुशबू तावडे (Khushboo Tawde) आणि तितीक्षा तावडे (Titeeksha Tawde). दोघींच्याही मालिका सध्या गाजत आहेत. तितीक्षाची 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' आणि खुशबूची 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केलंय. खुशबू आणि तितीक्षा सख्ख्या बहिणी आहेत. खुशबू थोरली तर तितीक्षा धाकटी आहे. आपल्या मुलींनी मिळवलेलं यश पाहून त्यांच्या आई वडिलांना प्रचंड अभिमान वाटतो. नुकतंच तितीक्षाने मुलाखतीत एक किस्सा शेअर केला.

तितीक्षा तावडेच्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेने नुकतंच 500 भागांचा टप्पा पूर्ण केला. यानिमित्त मालिकेच्या टीमने जंगी सेलिब्रेशन केले. हे पाहून आईवडिलांची काय प्रतिक्रिया असते यावर तितीक्षाने उत्तर दिलं. 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "माझे आई बाबा एकही एपिसोड चुकवत नाही. आई तर फक्त कौतुक करत असते. तिला वाईट बोलणं, आवाज चढवणं तर माहितच नाही. माझं बाळ काय काम करतंय, माझ्या बाळाने किती छान सीन दिला, डोळ्यात पाणी आलं असंच ती व्यक्त होत असते. ती फारच प्रेमळ आहे."

ती पुढे म्हणाली, "आमचं डोंबिवलीत एक गिफ्ट शॉपही आहे. दुकानात माझे आणि बहिणीचे पोस्टर्स लावलेत. मग जे ग्राहक येतात ते विचारतात की तुम्ही असे का पोस्टर्स लावलेत, तुम्हाला पैसे मिळतात का याचे? यावर आई म्हणते, नाही या आमच्या मुली आहेत. तेव्हा ते ग्राहक म्हणतात काहीही सांगता. मग घरी आल्यावर आई हे सगळं मला कौतुकाने सांगते. तेव्हा तिचं ऊर अभिमानाने भरुन येतं. तेव्हा मला खूप छान वाटतं."

तितीक्षा तावडे काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत तिने सातफेरे घेतले. दोघंही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. 

टॅग्स :तितिक्षा तावडेटेलिव्हिजनमराठी अभिनेताडोंबिवली