Join us  

तिप्पट टोलवसुलीनंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेमुळे ऋजुता देशमुख पुन्हा त्रस्त, म्हणाली, “नाटकाची बस...”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 3:22 PM

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील तिप्पट टोलवसुलीनंतर ऋजुताने पुन्हा शेअर केला अनुभव, म्हणाली...

‘कळत नकळत’ मालिकेत काम करुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋजुता देशमुख. तिने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. ऋजुताने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत तिला आलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टोलचा अनुभव सांगत संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता ऋजुताने पुन्हा मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील वेगळा अनुभव शेअर केला आहे.

ऋतुजा सध्या तिच्या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. नाटकाच्या प्रयोगाला जाताना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ऋजुताच्या नाटकाची बस पंक्चर झाली आहे. याबाबत ऋजुताने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडिओ शेअर केला आहे. “माझं आणि एक्सप्रेसवेचं नातं घनिष्ट होत चाललं आहे. आज आमची नाटकाची बस पंक्चर”, असं ऋजुताने स्टोरीमध्ये म्हटलं आहे. तिच्या या स्टोरीने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

“महाभारतावर चित्रपट बनला तर हनुमानाची भूमिका...”, ‘त्या’ वक्तव्यामुळे टायगर श्रॉफ ट्रोल

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मराठी अभिनेत्रीला आकारला गेला तिपट्ट टोल, नितीन गडकरींना टॅग करत म्हणाली...

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ऋजुताबरोबर नेमकं काय घडलं होतं?

काही दिवसांपूर्वी ऋजुता मुंबईहून पुण्याला जात असताना तिच्याकडून तळेगाव टोलनाक्यावर तिप्पट टोल आकारला गेला होता. मुंबईहून पुण्याला जाताना खालापूर टोलनाक्यावर २४० रुपये टोल आणि तळेगावला ८० रुपये टोल आकारला जातो. परंतु, ऋजुताकडून तळेगाव टोलनाक्यावरही २४० रुपये टोल आकारला गेला होता. याबाबत अभिनेत्रीने संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं असता, तुम्ही लोणावळ्यात थांबला होतात. आता मुंबई ते लोणावळा आणि लोणावळा ते पुणे असे दोन टप्पे केले आहेत..त्यामुळे दोन भागात २४० रुपये टोल आकारला जातो, असं उत्तर तिला देण्यात आलं होतं.

ऋजुताने याबाबत संताप व्यक्त करत व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने राज्य सरकार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना टॅगही केलं होतं. याबाबत तिने रीतसर तक्रारही नोंदवली आहे. परंतु, अजूनही कोणताच रिप्लाय आला नसल्याचं ऋजुताने म्हटलं आहे.

 

टॅग्स :मराठी अभिनेतामुंबईपुणे