Join us  

लाल सिग्नलचा फोटो पोस्ट करत शशांक केतकरची बेशिस्त नागरिकांना चपराक, पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 12:27 PM

शशांकने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.

मराठी अभिनेताशशांक केतकर (Shashank Ketkar) हा 'श्री' या नावानेच जास्त ओळखला जातो. 'होणार सून मी या घरची' मालिकेने त्याला खरी ओळख दिली. या मालिकेनंतर तरुणी तर त्याच्यासाठी अक्षरश: वेड्या झाल्या होत्या. शशांक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्याला सामाजिक भानही आहे. तो अनेकदा सामाजिक विषयांवर मत मांडतो, वेळप्रसंगी सरकारची कानउघाडणीही करतो. सेलिब्रिटी असल्याचा बडेजाव न दाखवता तो सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडतो. तसंच लोकांचं काही चुकत असेल तर तेही बिंन्धास्त दाखवतो. नुकतंच शशांकने केलेली एक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.

नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. दर नवरात्रोत्सवात नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांचं महत्व असतं. तसंच आजचा रंग लाल आहे. हाच धागा धरत शशांकने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्याने रस्त्यावरील लाल सिग्नलचा फोटो पोस्ट करत 'निदान आज तरी लाल सिग्नलला रिस्पेक्ट द्या' असं लिहिलं आहे.

कुठेही फिरायला जा नागरिक सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवताना दिसतात. शशांकने पोस्टमधून अशा बेजबाबदार लोकांना चपराक लगावली आहे. शशांकच्या पोस्ट अनेकदा अशाच बेधडक असतात. मग ते काम करुनही पैसे न मिळाल्याबाबत असो किंवा एखादं घर घेताना झालेली फसवणूक असो. तो सगळ्याच बाबतीत व्होकल राहिला आहे. 

सध्या शशांक स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' मालिकेत अक्षय मुकादम ही भूमिका साकारत आहे. यामध्ये त्याची आणि रमाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. 

टॅग्स :शशांक केतकरमराठी अभिनेतासोशल मीडिया