Join us

यशाचा मंत्र - अपयश, विश्वास, मेहनत : वैशाली माडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 18:49 IST

सतीश डोंगरेधावत्या युगात यशही झटपटच हवे अशी धारणा ठेवून करिअर करणाºयांची संख्या अगणित आहे. मात्र जोपर्यंत अपयश पचवून ...

सतीश डोंगरेधावत्या युगात यशही झटपटच हवे अशी धारणा ठेवून करिअर करणाºयांची संख्या अगणित आहे. मात्र जोपर्यंत अपयश पचवून विश्वास आणि मेहनतीच्या जोरावर तुम्हाला स्वत:ची वाट निर्माण करता येत नाही तोपर्यंत यश मिळविता येत नाही. त्यामुळे मनोरंजनासारख्या झगमगाटाच्या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करायचे असेल, तर स्वत:वरील विश्वास आणि मेहनतीच्या जोरावर भरारी घ्या, असे मत आघाडीच्या पार्श्वगायिका वैशाली माडे यांनी व्यक्त केले. त्यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न : झटपट यश आणि लोकप्रियतेसाठी रिअ‍ॅलिटी शो हाच उत्तम मार्ग असल्याचा समज रूढ होत आहे, असा समज बाळगणे कितपत योग्य?- रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमांतून अनेकांना रातोरात स्टारडम मिळाले. मात्र झटपट यश आणि लोकप्रियतेसाठी रिअ‍ॅलिटी शो हाच उत्तम मार्ग असल्याचा समज काहीसा घातक असल्याची माझी धारणा आहे. कारण अनेक पालक असे आहेत, जे आपल्या पाल्याला रिअ‍ॅलिटी शोमध्ये पाठविण्यासाठी प्रचंड उत्साही असतात. विशेष म्हणजे पुरेशी तयारी नसतानाही ते आपल्या पाल्याकडून रिअ‍ॅलिटी शोमध्ये यश मिळविण्याची अपेक्षा ठेवून असतात. हे त्या पाल्यासाठी खूपच घातक बाब आहे, असे मला वाटते. वास्तविक रिअ‍ॅलिटी शो करिअर घडविण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे, मात्र त्याकरिता तयारी आणि मेहनत खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे पालकांनी अवास्तव अपेक्षा न ठेवता, आपल्या पाल्याच्या अंगी असलेले गुण हेरून त्यादृष्टीने त्याला प्रोत्साहन द्यायला हवे. प्रश्न : मनोरंजन क्षेत्रात करिअर करताना गुणवत्तेपेक्षा गॉडफादर असायला हवा, यात कितपत तथ्यता आहे?- गॉडफादर असायलाच हवा, पण तुमच्यात गुणवत्ताही हवी. मनोरंजन क्षेत्रात तुम्हाला प्रत्येक दरवाजावरून नकार ऐकायला मिळतो, तो पचवून पुढे जाण्याची जोपर्यंत तुम्ही मानसिकता ठेवणार नाहीत, तोपर्यंत यश तुम्हाला हुलकावणी देतच राहणार. याचा अर्थ या क्षेत्रात गुणवत्तेला वाव नाही असे नसून, तुमच्यातील गुण हेरणारा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या वळणावर मिळतोच. फक्त संयम, विश्वास आणि मेहनत या त्रिसूत्रीवर तुमची वाटचाल असायला हवी. प्रश्न : हिंदी आणि मराठी रिअ‍ॅलिटी शोची विभागणी कशी कराल?- हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेतील रिअ‍ॅलिटी शोची व्याप्ती अमाप आहे. हिंदी रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून तुम्हाला मोठे व्यासपीठ आणि संधी अधिक मिळतात. या शोमधून तुम्ही रातोरात ग्लोबल स्तरावर पोहोचता. परंतु गेल्या काही काळाचा विचार केल्यास, मराठी रिअ‍ॅलिटी शोलादेखील ग्लोबल रूप प्राप्त झाले आहे. इतर भाषांच्या कलाकारांमध्ये मराठीबद्दल प्रचंड आकर्षण वाढत आहे. देशाच्या कुठल्याही कोपºयात गेल्यास, मराठीबद्दल प्रेम असलेले चाहते तुम्हाला दिसून येतात. त्यातच गेल्या काही काळातील मराठी चित्रपटांची झेप पाहता, मराठी ग्लोबल झाली हे कोणीच नाकारू शकत नाही. प्रश्न : संघर्षपूर्ण प्रवास करीत तुम्ही इंडस्ट्रीत स्वत:चे वलय निर्माण केले, तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल?- प्रामाणिकपणे गाणं गात आहे, हाच माझा आतापर्यंतचा प्रवास आहे. काम मिळविण्यासाठी कोणाचाही दरवाजा न ठोठावता गुणवत्ता आणि पात्रतेच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. कुटुंबाकडून मिळत असलेले पाठबळ माझ्यासाठी नेहमीच ऊर्जा देणारे आहे. जेव्हा मी या क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा चिंतन करून स्वत:मधील पात्रता ओळखली. सुरुवातीचा प्रवास खडतर होता. पण यातून मार्ग काढण्याची जिद्द अंगी बाळगल्यानेच आजपर्यंतचा प्रवास सर करता आला. प्रश्न : आगामी प्रोजेक्टबद्दल काय सांगाल?सध्या हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेतील प्रोजेक्टवर काम करीत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘आम्ही दोघी’ या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी ‘रणांगण’मधील एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांच्या ते पसंतीस येताना दिसत आहे. त्याचबरोबर काही हिंदी प्रोजेक्टवरही सध्या मी काम करीत आहे.