Join us  

​मनोज वाजपेयीने सांगितले त्याच्या स्ट्रगलिंग दिवसांविषयी.. पाटण्यात राहायचा एका छोट्याशा घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 7:47 AM

मनोज वायपेयीने त्याच्या अभिनयाने आज बॉलिवूडमध्ये त्याची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले ...

मनोज वायपेयीने त्याच्या अभिनयाने आज बॉलिवूडमध्ये त्याची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सत्यामध्ये त्याने साकारलेला भिखू म्हात्रे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. तसेच शूल या चित्रपटात सिस्टमला विरोध करणाऱ्या पोलिसवाल्याची भूमिका त्याने खूपच चांगल्याप्रकारे साकारली होती. मनोज वाजपेयीचा आजवरचा बॉलिवूड प्रवास खूपच रोचक राहिला आहे. पण हा प्रवास मनोजसाठी सोपा नव्हता. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खूपच स्ट्रगल केला आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर २ या कार्यक्रमात मनोजने नुकतीच हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने त्याच्या स्ट्रगलिंग दिवसांविषयी सगळ्यांना सांगितले. त्याने या कार्यक्रमात त्याच्या कुटुंबियांविषयी भरभरून गप्पा मारल्या. त्याने सांगितले, माझे वडील शेतकरी होते आणि पाटणा येथे आमचे एक छोटेसे घर होते. त्यात मी माझे पालक आणि माझ्या सहा भावंडांसोबत राहत होतो. आमची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. मी इतका प्रसिद्ध अभिनेता बनेन असा विचार माझ्या कुटुंबियांनी स्वप्नात देखील केला नव्हता. पण देवाच्या कृपेमुळे परिस्थितीवर मात करण्याचे बळ मला मिळाले आणि मी माझ्या क्षेत्रात प्रचंड यश मिळवले. माझा संघर्ष सोपा नव्हता. मला अनेकवेळा नकार ऐकावा लागला. पण दांडगी इच्छाशक्ती आणि देवावरील श्रद्धेमुळे मी या स्थानावर पोहोचलो. मला संघर्षाची कधीच भीती वाटली नाही. उलट मला यशाची भीती वाटते. यश कसे सांभाळायचे याची भीती वाटते. पण यश मिळाल्यामुळे एक मनुष्य म्हणून माझ्यात काहीच बदल झालेला नाहीये.”मनोज वाजपेयीला त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिल्पा शेट्टी कुंद्रा या आपल्या प्रिय मैत्रिणीला आणि अनुराग बासू, गीता कपूर यांना सुपर डान्सर २ या कार्यक्रमाच्या निमित्ताने कित्येक दिवसांनंतर भेटायला मिळाल्यामुळे मनोज चांगलाच खूश झाला होता.सुपर डान्सर २ मध्ये रितिक दिवाकरने मनोजसमोर खूपच चांगला परफॉर्मन्स सादर केला. त्याचे नृत्य पाहून मनोज चांगलाच प्रभावित झाला होता. रितिकने जर्मन व्हीलचा प्रॉप म्हणून वापर करत लक्ष्य या गीतावर नृत्य सादर केले. त्याचे हे नृत्य पाहून मनोजने त्याचे भरभरून कौतुक केले. Also Read : ​गणेश आचार्यने एकावेळी खालल्या होत्या २०० इडल्या