Join us  

मंदिरा बेदी,अनिता हंसनंदानी आणि जेनिफर विंगेट सांगतायेत #shaveyouropinion

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2017 9:45 AM

कोणत्याही मुलीचे लैगिंक छळ झाला असेल, तर लगेच त्या पिडीत मुलीवर प्रश्न निर्माण केले जातात. त्या मुलीचीच चुकी असल्याचे ...

कोणत्याही मुलीचे लैगिंक छळ झाला असेल, तर लगेच त्या पिडीत मुलीवर प्रश्न निर्माण केले जातात. त्या मुलीचीच चुकी असल्याचे सांगत अपराधी मात्र मोकळाच फिरतो. मुलीचे आयुष्य उध्वस्त केल्यानंतर मुलींना कपडे घालण्याचा सेंन्सच नसतो म्हणून अशा घटना घडतात असे सांगणारे महारथीही आपल्या देशात कमी नाहीयेत. मुलींनी काय घालावे,कसे कपडे घालावे अशा सगळ्याच गोष्टींची बंधन ठेवली जातात.मुळात देशात मुलींवर होणारे अत्याचार हे मुलींनी तोकडे कपडे  घातलेल्यामुळे होत नाहीत,याला मानसिक प्रवृत्ती कारणीभूत असते.त्यामुळे काही शाळा आणि कॉलेजमध्येही विद्यार्थिनींनी चक्क जीन्स- टॉप घालू नये, असेही फतवे काढल्याचे ऐकायला मिळते.अशाच मानसिक वृत्तीला धडा शिकवण्यासाठी काही टीव्ही महिला कलाकार पुढे सरसावले आहेत. मंदिरा बेदीनेही हातात रेजर दाखवत फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहे.त्यात तिने म्हटले आहे की,महिलांवर कोणत्याही गोष्टीची बंधन घालताना जरा स्वत:ची मानसिकता कोणत्या दर्जाची आहे ते पाहा.मी काय आणि कशाप्रकारचे कपडे घालावे असा फुकटचा सल्ला देणा-यांनी स्वत:चे गढूळ विचार या रेजरने काढून टाका #shaveyouropinion असे हॅशटॅग टॅग करत आपले मत मांडले आहे. तर दुसरीकेड अनिता हंसनंदानीनेही मंदिरा प्रमाणेच रेजर हातात घेत फोटो शेअर केला आहे.त्यात तिने म्हटले आहे की,ज्या पुरूषांना वाटते की,महिलांनी त्यांच्या मर्जीनुसारच कपडे परिधान करावे,पूर्ण शरीर झाकले जाईल असेच कपडे महिलांनी घालावेत असा सल्ला देणारे तुम्ही कोण? महिलांनी काय करावे, काय करू नये हे सांगणारे तुम्ही कोण? देश घडवायचा असेन तर विचारही चांगले ठेवा,असे तोकडे विचाराने देश घडणार नाही. #shaveyouropinion असे म्हणत तिने महिलांविषयी असा विचार करणा-या पुरुषांनाच खडसावले आहे. जेनिफर विंगेटनेही अशी गलिच्छ मानसिकता असणा-यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.महिलांना त्यांच्या कपड्यांवरून करणारे  तुम्ही कोण? असा विचार कऱणारी लोक स्वत:ची वैचारिक पातळी समाजासमोर दाखवून देत असतात.त्यामुळे आधी स्वत:चे विचार प्रगल्भ करा नंतर महिलांना शिकवा.#shaveyouropinion म्हणत तिने आपले मत मांडले आहे.