Join us  

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतल्या एका सीनसाठी मंदार जाधवने घेतली इतकी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 7:17 PM

अभिनेता मंदार जाधव प्रत्येक सीनसाठी बरीच मेहनत घेतो. हेच त्याच्या या सीनवरुन स्पष्ट होते.

छोट्या पडद्यावर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका प्रचंड गाजतेय. मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.दमदार कलाकारांचा अभिनय आणि मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर असून लवकरच मालिकेत कबड्डीचा सामना देखील रंगणार आहे. शालिनीने शिर्केपाटील कुटुंबाची बळकावलेली प्रॉपर्टी मिळवायची तर तिच्यासोबतचा कबड्डीचा सामना जिंकावा लागेल अशी अट असल्यामुळे आता जयदीप-गौरी आणि संपूर्ण कुटुंबाने कंबर कसली आहे. कबड्डीचा सामना जिंकायचा तर चांगला प्रशिक्षक हवा. याच प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी जयदीप जंगलामध्ये गेला असताना भलत्याच संकटात सापडला. झाडाला लावलेल्या फासात त्याचा पाय अडकला आणि तो उलटा टांगला गेला.

कलाकारांना आपण नेहमी वेगवेगळ्या रुपात पाहतो.मात्र त्यासाठी हे कलाकारही प्रचंड मेहनत घेतात.कोणतीही भूमिका साकारण्यासाठी कलाकार मंडळी बरीच मेहनत घेत असतात. या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळावा, ती व्यक्तीरेखा जिवंत आणि हुबेहूब वाटावी यासाठी कलाकार बरीच मेहनत घेतो. यासाठी वाट्टेल ते करून ती भूमिका रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थाने जगण्यासाठी कलाकार विशेष कष्ट आणि मेहनत घेतात. अभिनेता मंदार जाधव त्याच कलाकारांपैकी एक. प्रत्येक सीनसाठी तो बरीच मेहनत घेतो.हेच त्याच्या या सीनवरुन स्पष्ट होते.

अवघ्या काही मिनिटांच्या या सीनसाठी जयदीपची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवने बरीच मेहनत घेतली. चार ते पाच तास या भागाचं शूटिंग सुरु होतं. हा सीन शूट करणं अवघड तर होतंच आणि तितकंच जबाबदारीचं देखील होती. फाईट मास्टर, दिग्दर्शकांच्या सुचना आणि सेटवरील सर्व मंडळींच्या सहकार्याने मंदारने हा अवघड सीन पूर्ण केला. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हे आव्हान स्वीकारल्याचं त्याने सांगितलं. हा प्रसंग कायम लक्षात राहिल असंही तो म्हणाला.