Join us  

मानव गोहिल, आस्था चौधरी आणि चाहत तेवानी केसरी नंदन नवीन शो मध्ये करणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 3:25 PM

केसरी नंदन मध्ये केसर नावाच्या एका तरूण मुलीचा प्रवास निवेदित केलेला आहे आणि ती भूमिका चाहत तेवानीने करत आहे, तिचे स्वप्न आहे तिचे वडील- हनुमंत सारखे कुस्तीगीर व्हायचे. केसर सर्व अडथळ्यांवर मात करणार आहे आणि जिंकण्यासाठी  धैर्य दाखविणार आहे.  

कलर्स आता अजून एका प्रेरणादायी कथेच्या शुभारंभासाठी सज्ज झाला आहे ज्यात वडील-मुलगी यांचे नाते, आईचे प्रेम आणि भावाने निरपेक्ष भावनेने बहिणीचे स्वप्न सत्यात येण्यासाठी केलेली मदत या सर्वांची भावनाशील कथा आहे आणि त्यातून समाजाचे नियम पुनर्व्याख्यित केले आहेत. केसरी नंदन मध्ये केसर नावाच्या एका तरूण मुलीचा प्रवास निवेदित केलेला आहे आणि ती भूमिका चाहत तेवानीने करत आहे, तिचे स्वप्न आहे तिचे वडील- हनुमंत सारखे कुस्तीगीर व्हायचे. केसर सर्व अडथळ्यांवर मात करणार आहे आणि जिंकण्यासाठी  धैर्य दाखविणार आहे.  

टेलिव्हिजन अभिनेता मानव गोहिलला केसरच्या वडीलांच्या हनुमंताच्या भूमिकेसाठी घेतले गेले आहे. हनुमंत हे असे गृहस्थ आहेत जे स्त्रियांचा सन्मान करतात आणि त्यांच्या निवडीचा सुध्दा आदर करतात. आस्था चौधरी हनुमंतच्या पत्नीची-माधवीची आणि केसरच्या आईची भूमिका करणार आहे. माधवी अतिशय परिपूर्ण स्त्री आहे. ती घरासाठी कर्तव्यनिष्ठ आहे आणि प्रामाणिक पत्नी आहे. ती केसरीच्या प्रवासासाठी कारणीभूत ठरणार आहे.  

या सर्व घडामोडी विषयी मानवने उत्साहाने सांगीतले, “केसर नंदन ही एक अतिसय सुंदर कथा आहे. मी त्यात हनुमंतची भूमिका साकारत आहे, जो शब्दाला जागणारा मनुष्य आहे. कुस्तीचा विषय तर त्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. हनुमंतला आशा आहे की एक दिवस त्याचा मुलगा त्याच्या सारखा बनून अभिमानास्पद कामगिरी करेल.”आस्था म्हणाली, “माधवीचे पात्र सशक्त आहे आणि मला या भूमिके साठी निवडल्याबद्दल मला आनंद झाला आहे. केसरी नंदन ही अतिशय सुंदर लिहिलेली कथा आहे आणि आम्हाला खात्री आहे की प्रेक्षकांना सुध्दा हा शो आणि ही ताजीतवानी कथा नक्कीच आवडेल.” केसरी नंदन लवकरच कलर्स वर प्रसारीत होणार आहे

टॅग्स :रंग