Join us

मानसी मुलतानी ही टीव्ही अभिनेत्री समजते स्वत:ला माधूरी दिक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 12:20 IST

प्रत्येकाला मी माधुरी दिक्षित सारखे दिसावे अशी इच्छा असते.यावरच काही वर्षांपूर्वी ''मैं माधूरी दिक्षित बनना चाहती हुँ'' हा सिनेमा ...

प्रत्येकाला मी माधुरी दिक्षित सारखे दिसावे अशी इच्छा असते.यावरच काही वर्षांपूर्वी ''मैं माधूरी दिक्षित बनना चाहती हुँ'' हा सिनेमा आला होता. अंतरा माळी हिने या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती.अंतराने साकारलेली चुटकी ही माधुरी दिक्षितची मोठी फॅन असते सिनेमात काम करण्याची इच्छा असलेली चुटकी माधुरीप्रमाणेच दिसण्यासाची तिची इच्छा, असते. तिच्याप्रमाणेच रूपेरी पडद्यावर झळकण्याची इच्छा असते. अशी ती या सिनेमात अंतराने चुटकी ही व्यक्तिरेखा रंगवली होती. आता त्याचप्रमाणे आता टीव्ही अभिनेत्री मानसी मुलतानीलाही हर मर्द का दर्द मालिकेत माधुरी इच्छा बनण्याची इच्छा झाली आणि अगदी तिच्या प्रमाणेच तिने माधुरी दिक्षितसारखा मेकअपही केल्याचे पाहायला मिळाले.मानसी या मालिकेत अप्सरा हे भूमिका साकारत आहे.याधीही मालिकेत तिने वेगवेगळे गेटअपच्या व्यक्तिरेखा रंगवल्या आहेत.एका भागासाठी मानसीला एक मराठमोळी स्त्रीची भूमिका साकारायची होती.या भूमिकेसाठी  तिने 'सैलाब' सिनेमातील ''हम को अजकल है''.... गाण्यातल्या माधुरी दिक्षितपासून प्रेरणा घेत ही भूमिका साकारल्याचे मानसीने सांगितले.लहानपासूनच मानसी माधुरीची मोठी फॅन आहे.ज्यावेळी तिला माधुरीदिक्षित प्रमाणे दिसण्याची संधी मिळाली,तेव्हा तिने लगेचच या भूमिकेसाठी माधुरी दिक्षित कशी अभिय करते,तिच्या चालने-बोलने या गोष्टींचे निरिक्षण करण्यास सुरूवात केली.मानसीची या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका आहे.यातील नायकाला महिलांच्या मनात नेमके काय सुरू असते. या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते.विशेष म्हणजे त्याला तसे वरदानही मिळते. त्यामुळे तो महिलांच्या मनातील विचारही जाणून घेत असतो.यांत अप्सरा विनोदला सल्ले देऊन  त्याच्या समस्या दूर करण्यास मदत करते.