Join us

मल्लाईकाने अरबाजबद्दल बोलणे टाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 12:57 IST

अभिनेत्री मल्लाईका अरोरा-खान आणि अभिनेता अरबाज खान हे घटस्फोट घेणार असल्याचे आता पक्के झाले आहे. मल्लाईका कित्येक दिवसांपासून तिच्या ...

अभिनेत्री मल्लाईका अरोरा-खान आणि अभिनेता अरबाज खान हे घटस्फोट घेणार असल्याचे आता पक्के झाले आहे. मल्लाईका कित्येक दिवसांपासून तिच्या मुलाला घेऊन वेगळी राहात आहे.नुकत्यात इंडियाज गॉट टायलेंट या कार्यक्रमाच्या झालेल्या पत्रकार परिषदेत तिला अरबाजबाबत विचारले असता तिने याबाबत बोलणे टाळले. इतकेच नव्हे तर या प्रश्नाचा सतत मारा तिच्यावर होऊ नये यासाठी पत्रकार परिषदेत संपल्यावर लगेचच तिने तिथून पळ काढला.अरबाजबद्दल तिने काहीही बोलणे टाळले असले तरी आपला लाडका दीर अभिनेता सलमान खान याची तिने पाठराखण केली. आॅल्पिकमध्ये सलमान खानची अ‍ॅम्बेसेडर पदी नेमणूक करण्यात आल्यामुळे सध्या प्रचंड वाद सुरू आहे.पण सलमानच्या नेमणुकीमुळे आॅल्पिकला फायदाच होणार असल्याचे तिचे म्हणणे आहे.