Join us  

Majhi Tujhi Reshimgath : एक दूसरे से करते हैं प्यार हम...., मालिका संपताना प्रार्थना झाली भावुक, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 1:10 PM

Majhi Tujhi Reshimgath : प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मालिकेच्या सेटवरचे काही बीटीएस क्षण पाहायला मिळतात

‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील यश आणि नेहा अर्थात श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरेची (Prarthana Behere) जोडी प्रेक्षकांना भलतीच आवडली. पण आता प्रेक्षकांची ही लाडकी मालिका निरोप घेणार आहे. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग झालं आणि यादरम्यान सगळेच कलाकार भावुक झालेले दिसून आले. प्रार्थना तर कमालीची भावुक झाली. प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मालिकेच्या सेटवरचे काही बीटीएस क्षण पाहायला मिळतात. यात सगळेच कलाकार सेटवर धम्माल करत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करताना प्रार्थनाला गहिवरून आलं. ‘एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम.....,’ असं कॅप्शन देत प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मालिकेला दिलेल्या प्रेमासाठी प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत.याआधीही प्रार्थनाने नेहा कामत या व्यक्तिरेखेला निरोप देताना खास पोस्ट लिहिली होती. नेहा कामत म्हणून हे शेवटचं रील असेल असंदेखील तिने म्हटलं होतं.  

 प्रार्थना बेहेरेने ‘पवित्र रिशता’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. पहिल्याच मालिकेने तिला लोकप्रियता मिळाली आहे.यानंतर तिने मितवा, मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस अशा गाजलेल्या सिनेमांत काम केलं.  ‘माझी तुझी रेशीमगाठ’या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  चाहते निराश आहेत. पण शो मस्ट गो ऑन म्हणतात, त्याचप्रमाणे ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या जागी एक नवी मालिका सुरू होतेय.

‘दार उघड बये’ होणार सुरू‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेची जागा ‘दार उघड बये’ ही नवी मालिका घेणार आहे. 19 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता ही मालिका प्रेक्षक झी मराठीवर पाहू शकतात.  

टॅग्स :प्रार्थना बेहरेटेलिव्हिजनमराठी अभिनेताश्रेयस तळपदे