Join us  

में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो फेम नमिश तनेजाने सांगितले त्याचे आवडते हनीमून डेस्टिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 3:51 PM

में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात या मालिकेची नायिका जया (सृष्टी जैन) समरशी लग्न करते असे आपल्याला पाहायला मिळाले आहे. समर एक अत्यंत रोमँटिक मुलगा आहे आणि त्यामुळे हनीमूनची योजना आखत आहे

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवरील में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेमध्ये अभिनेता नमिश तनेजा साकारत असलेल्या समर या आदर्श जावयाच्या हृदयस्पर्शी भूमिकेमुळे त्याला दिवसेंदिवस लोकप्रियता मिळत आहे. मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात या मालिकेची नायिका जया (सृष्टी जैन) समरशी लग्न करते असे आपल्याला पाहायला मिळाले आहे. समर एक अत्यंत रोमँटिक मुलगा आहे आणि त्यामुळे हनीमूनची योजना आखत आहे, मात्र त्याचवेळी त्याची सासू सत्यदेवी हिच्या सततच्या हस्तक्षेपाने तो चिंतित देखील झाला आहे आणि त्याच वेळी मालिकेने एक महत्त्वपूर्ण वळण घेतले आहे. जयाने पुन्हा एकदा सुराणा परिवाराला धमकावले आहे की, जर तिचं म्हणणं मान्य झालं नाही तर ती तिच्या माहेरी निघून जाईल. सध्याच्या ट्रॅकविषयी बोलताना आम्ही जेव्हा नमिशला त्याच्या आवडत्या हनीमून ठिकाणाविषयी विचारले तेव्हा तो सांगतो, "ते स्वित्झर्लंड असावे! या पृथ्वीवरच्या स्वर्गाला माझी माझ्या जोडीदारासोबत भेट देण्याची इच्छा माझ्या मनात आहे. बर्फाच्छादित पर्वत, रमणीय भूप्रदेश यामुळे माझ्या पसंतीचा हनीमून स्पॉट म्हणून स्वित्झर्लंड प्रथम क्रमांकावर आहे. समरच्या देखील अशाच आवडीनिवडी आहेत आणि म्हणूनच त्याला देखील अशाच रोमँटिक, शांत आणि सुरेख स्थानावर जायला आवडेल." समर आणि जया यांच्या विवाहित आयुष्यातील सत्यदेवीच्या हस्तक्षेपाविषयी विचारल्यावर नामिष सांगतो, "आईचे आपल्या मुलीबद्दल चौकस असणे स्वाभाविक आहे आणि विशेषकरून जेव्हा तिचे लग्न होते, तेव्हा आईची चिंता अनेकदा वाढते. मुलीच्या वैवाहिक जीवनात आईची काळजी आणि हस्तक्षेप या दोन भिन्न गोष्टी आहेत. मात्र आमच्या या मालिकेत सत्यदेवीचा सातत्यपूर्ण हस्तेक्षेप जया आणि समरच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या निर्माण करत आहे. त्यामुळे वास्तविक जीवनात आपल्याला एक रेषा आखावी लागेल की, जिथे आईने हे समजून घेण्याची गरज आहे की आता मुलीचे लग्न झालेले आहे आणि ती तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे. तिच्या आयुष्यातील समस्या सोडवण्याइतपत ती सुजाण आहे आणि हो वेळोवेळी तिला मार्गदर्शन करणे आवश्यक आहे परंतु, सततचा हस्तक्षेप वैवाहिक जीवनामध्ये बेबनाव निर्माण करू शकतो."

टॅग्स :में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियोनमिश तनेजा