Join us  

बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरमध्ये महेश मांजरेकर यांची धमाकेदार एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 7:21 AM

जगभरात खळबळ माजवणारा, अनेक देशांमधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”... हा ...

जगभरात खळबळ माजवणारा, अनेक देशांमधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”... हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे १५ एप्रिलपासून कलर्स मराठीवर आपल्या मराठी भाषेमध्ये हा कार्यक्रम येत आहे हे कळल्यावर या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या होत्या... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहे.  कार्यक्रमाच्या सेटपासून, स्पर्धक, यांच्याबद्दल बरीच गुप्तता राखली जात आहे. पण १५ एप्रिल रोजी संध्याकाळी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर होणार असून, यामध्ये महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री होणार आहे, तसेच स्पर्धकांची नावे देखील प्रेक्षकांना कळणार आहेत.महेश मांजरेकर ओ राजे, दे धक्का आणि बिग बॉसचे सध्या गाजत असलेल्या शीर्षकगीतावर परफॉर्मन्स  करणार असून याचे नृत्यदिग्दर्शन प्रतिक उतेकर याने केले आहे. शीर्षकगीतामध्ये महेश मांजरेकर यांचा कधी न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना मिळत आहे आणि आता बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला देखील असाच वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे यात शंका नाही. बऱ्याच वेगळ्या स्टेप्स महेश मांजरेकर यांनी act मध्ये केल्या असून त्यांनी स्टेजवर काच ब्रेक करून स्टेजवर धमाकेदार डांसची सुरुवात करणार आहेत. तसेच बिग बॉसच्या घरामध्ये नक्की कोण कोण असणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना बऱ्याच महिन्यांपासून होती. १५ स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये १५ एप्रिलला एन्ट्री करणार आहेत त्यामुळे आता येणारे १०० दिवस ते कसे एकत्र राहतील, त्यांच्यामध्ये काय काय होईल हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत यात शंका नाही. या कार्यक्रमाबद्दल बिग बॉसचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी – किस्से असो हे विषय लोकांच्या दैनंदिन आयुष्यात मध्ये चर्चेचा विषय झाले. बिग बॉसच्या घरामधील प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकरांची भांडण असो, प्रेम असो वा मैत्री असो... घरामध्ये असलेल्या कलाकारांची सुख - दु:ख सुध्दा प्रेक्षकांनी आपलिशी केली. फक्त कलाकारच नव्हे तर सामान्य माणसांमधून आलेल्या स्पर्धकांना देखील भारताने तितकेच प्रेम दिले आणि लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. कलर्स मराठीवर सुरु होणाऱ्या मराठी बिग बॉसवर देखील प्रेक्षक असेच प्रेम करतील ही आशा आहे.