Join us  

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते प्रसाद खांडेकर लवकरच दिसणार 'या' नाटकात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 1:33 PM

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अभिनेते प्रसाद खांडेकर हे नाव घराघरात पोहोचले.

सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अभिनेते प्रसाद खांडेकर  घराघरात पोहोचला. लवकरच प्रसाद  आता 'कुर्रर्रर्रर्र’ हया नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकरने केले असून प्रमुख भूमिकेतही तो दिसणार आहे. 'प्रग्यास क्रिएशन्स' आणि व्ही. आर. प्रॉडकशन्स हया नाट्यसंस्थेच्या माध्यमातून हे नाटक रंगभूमीवर येत आहे. अभिनेते प्रसाद खांडेकरने मराठी रंगभूमी सोबतच गेली कित्येक वर्षे हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर सुद्धा लेखक - दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटविला असून हास्यजत्रेत विविधांगी भूमिकेतून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

"कुर्रर्रर्रर्र" म्हणजे काय ? किंवा हया नावाचा अर्थ काय ? हा प्रश्न रसिकांना पडला असेलच.  हे नाटक सत्य घटनेवर आधारीत असून आई – वडील, मुलगी आणि जावई ह्यांच्या भोवती फिरणारं नाटक आहे. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित आणि अभिनित हे नाटक शंभर टक्के हलकी फुलकी कॉमेडी असणार हे नक्की. संगीताची जबाबदारी अमिर हडकर अणि नेपथ्यची जबाबदारी संदेश बेंद्रे यांनी सांभाळली आहे. हास्यजत्रेत धुमाकुळ घालणारा, रसिकांच्या गळ्यातला ताईत असलेला प्रसाद खांडेकर रंगभूमीवर काय जादू करणार आहे, हयाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहेच. "कुर्रर्रर्रर्र " हे नाटक येत्या एप्रिल महिन्यात रंगभूमीवर येत आहे.

टॅग्स :सोनी मराठी