Join us  

Corona Virus: whatt....कलाकार का म्हणातायेत ‘आम्हाला फरक पडत नाही, जोवर आमचा कोणी जात नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 6:54 PM

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या कलाकारांनी मिळून जनजागृतीवर आधारित अशाच प्रकारे व्हिडीओ बनवला होता

कोरोना विषाणूचा संसर्ग थांबतच नाहीय. या विषाणूने सामान्य लोकांपासून स्टार्सनाही भीतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त संख्येत वाढ होत असल्याचे चित्र जगात पाहायला मिळत आहे. यात अनेकाना  कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. कुठेतरी या गोष्टीला आळा बसावा, कोरोनाचे संक्रमण थांबावे यासाठी शासनाकडून उपायोजना सांगण्यात येत आहे. शासनाच्या आदेशनानुसार आता २१ दिवसांचाही भारतात लॉक डाऊन करण्यात आले आहे. मात्र तरीही असे काही महारथी आपल्याला याचे पालन करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. घरीच बसा आणि सुरक्षित रहा हेच वारंवार सांगताना आता सगळ्यांचेच घसे कोरडे पडत आहे. 

तरीही काहीही फरक पडत नसल्याचे अनेक उदाहणं समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या कलाकारांनी मिळून जनजागृतीवर आधारित अशाच प्रकारे व्हिडीओ बनवला होता अगदी त्याच धरतीवर आता मराठी कलाकारांचाही व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचे कलाकार, तंत्रज्ञ आणि कार्यक्रमाची संपूर्ण टीम यांनी मिळून ही  व्हिडीओ बनवला आहे.

या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या जिवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचा मान राखून तरी सर्वांनी घरात बसून स्वतःचं व देशाचं रक्षण करावं असं आवाहन करण्यात आले आङे. तसेच ‘आम्हाला फरक पडत नाही, जोवर आमचा कोणी जात नाही’, अशा शब्दांत या कलाकारांनी लोकांना सध्या घरी राहण्याचं महत्त्व पटवून दिले आहे.

तसेच नुकतेच लॉक डाउन म्हणजे नेमके काय? हे समजवण्याची गरज लोकांना आहे. अभिनेत्री पूजा बेदीने नुकताच समुद्र किनाऱ्यावरचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत कॅप्शनद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने लिहिले आहे की, खरंच हा लॉकडाऊन आहे का? की लोक समुद्र किनाऱ्यावर सुट्ट्या असल्याने फिरायला आले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आपण कशाप्रकारे थांबवणार आहोत? पूजाने या ट्वीटमध्ये महाराष्ट्र पोलिस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस