मस्तानी सोबत वैभवचा क्लिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 02:07 IST
मस्तानीच्या मनमोहक सौंदर्याच्या चर्चा पुर्वीपासुन रंगत आल्या आहेत. आपल्या पण आयुष्यात मस्तानीसारखी सुंदर मुलगी ...
मस्तानी सोबत वैभवचा क्लिक
मस्तानीच्या मनमोहक सौंदर्याच्या चर्चा पुर्वीपासुन रंगत आल्या आहेत. आपल्या पण आयुष्यात मस्तानीसारखी सुंदर मुलगी असावी असे कोणाला वाटले नाही तर नवलच. पण चॉकलेट बॉय वैभव तत्ववादी मात्र याबबतीत खरच लकी ठरला म्हणावे लागेल कारण त्याने चक्क मस्तानीसोबत फोटो काढला आहे. आता ही मस्तानी कोण असे वाटत असेल तर ती दुसरी कोणी नसुन तिच्या सुंदर रुपाने चाहत्यांना घायाळ करणारी बॉलीवुडची क्वीन दिपीका पादुकोन आहे. बाजीराव मस्तानी या चित्रपटामध्ये मस्तानीची भुमिका साकारुन दिपिकाने मोठ्या पडद्यावर मस्तानी जिवंत केली होती. याच चित्रपटामध्ये बाजीरावच्या भावाची म्हणजेच चिमाजी अप्पांची भुमिका वैभवने केली होती. मग अशावेळी खुद्द मस्तानी म्हणजेच दिपिका सोबत फोटो काढण्याची संधी वैभव कसा गमवेल. दिपिकासोबत सेल्फी घेण्याची इच्छा पुर्ण करीत कॅज्युअल लुकमध्ये दोघांनीही मस्त सेल्फी काढला आहे.