Join us  

हा आहे माधुरी दीक्षितचा आवडता चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 1:40 PM

डान्स दिवानेच्या मंचावर नुकतीच अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल यांनी हजेरी लावली होती. ते मनमर्झिया या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात आले होते. यावेळी माधुरीने तिचा आवडता चित्रपट कोणता हे सगळ्यांना सांगितले.

डान्स दिवाने हा कार्यक्रम प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचा सेमी फिनाले लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. फिनाले साठी स्पर्धक चांगली कामगिरी करण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत. डान्स दिवानेच्या मंचावर नुकतीच अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल यांनी हजेरी लावली होती. ते मनमर्झिया या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात आले होते. त्यांनी या कार्यक्रमातील स्पर्धकांसोबत खूप मजा-मस्ती केली. त्यामुळे स्पर्धकांनी देखील टेन्शन फ्री होऊन आपले परफॉर्मन्स सादर केले.

डान्स दिवाने या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक परफॉर्मन्स सादर करत आहेत. त्यामुळे कोणत्याही स्पर्धकाला कार्यक्रमातून बाहेर जाण्यासाठी निवडणे हे परीक्षकांसाठी कठीण होत चालले आहे. पडोसन मधील एक चतुर नार या गाण्यावर तर आलोक आणि अद्विकने अतिशय सुंदर नृत्य सादर केले. त्यांचे नृत्य या कार्यक्रमाच्या परीक्षकांना आणि मनमर्जियाच्या टीमला प्रचंड आवडले. त्यांनी या नृत्यासाठी आलोक आणि अद्विकचे भरभरून कौतुक केले. 

पडोसन या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटात किशोर कुमार, सुनील दत्त, सायरा बानू आणि मेहमूद यांनी खूप चांगला अभिनय केला होता. या चित्रपटाची सगळीच गाणी अतिशय सुंदर आहेत. हा सिनेमा अनेकांना प्रचंड आवडतो. पडोसन हा माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक असल्याचे हा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर या कार्यक्रमाची परीक्षक माधुरी दीक्षितने सगळ्यांना सांगितले. तिने सांगितले की, "जेव्हा मला कंटाळा येतो किंवा माझा मूड खराब असतो, तेव्हा मी मूड ठीक करण्यासाठी पडोसन पाहते आणि माझा मूड लगेचच चांगला होतो. किशोर कुमार, मेहमूद साहब, सुनिल दत्त आणि सायरा बानू यांच्यासारखे दिग्गज कलाकार या सिनेमात आहेत. त्यांची कॉमिक टायमिंग आणि केमिस्ट्री अगदी अचूक आहे आणि त्यामुळे हा सिनेमा पाहताना मला कधीच कंटाळा येत नाही.”

टॅग्स :माधुरी दिक्षित