Join us  

धकधक गर्ल या गोष्टीची आहे दिवानी, माधुरी म्हणते, ही गोष्ट मला नेहमी करते प्रेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 7:15 AM

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षितने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे.

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षितने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. ती लवकरच डान्स रिएलिटी शोमध्ये दिसणार आहे. या शोचे नाव आहे डान्स दीवाने. हा रिएलिटी शो कलर्स वाहिनीवर पहायला मिळणार आहे. डान्स दीवाने या डान्स रिएलिटी शोचा दुसरा सीझन नुकताच लाँच करण्यात आला. या शोमधून पुन्हा एकदा माधुरी दीक्षित परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. या शोमध्ये माधुरीला परिक्षकाच्या भूमिकेत दिग्दर्शक शशांक खेतान आणि तुषार कालिया यांची साथ लाभली आहे.

डान्स दीवाने शोचे दुसऱ्यांदा परीक्षण करायला मिळणार म्हणून माधुरी खूप खूश आहे.

याबद्दल ती म्हणाली की, मी स्वतः डान्सची खूप दीवानी आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा शो खूप खास आहे. या शोच्या पहिल्या सीझनमुळे दुसऱ्या सीझनमधील टॅलेंट पाहण्यासाठी खूप प्रेरीत व उत्सुक केले आहे. दुसऱ्यांदा परिक्षक बनले याचा मला खूप आनंद आहे. डान्स करण्यासाठी वयाला मर्यादा नसते, हे सिद्ध करणारा हा शो मला नेहमीच प्रेरीत करतो. यात तीन वेगवेगळ्या पिढ्यांना एकत्र डान्स करताना पाहणे खुप कमालीचे ठरणार आहे. 

माधुरी व्यतिरिक्त या शोचे परीक्षक शशांक खेतान व तुषार कालियादेखील या शोबाबत खूप उत्साही आहेत. शशांक खेतान म्हणाला की, या शोचा एक भाग झाल्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान मानतो. अशा कॉन्सेप्टसोबत या शोमुळे मला खूप काही शिकायला मिळाले.

टॅग्स :माधुरी दिक्षितकलर्स