कलर्स मराठीवरील रमा राघव (Rama Raghav) मालिका प्रेक्षकांची मने जिंकत आहे. पैजेवर जग जिंकणारी 'रमा' आणि प्रेमाने जग आपलेसे करणारा 'राघव' यांची खट्याळ जोडी सगळयांच्या पसंतीस उतरत आहे. संस्कार ,संस्कृती, परिश्रम याशिवाय आयुष्यात काही मिळत नसतं याची शिकवण अंगी भिनलेल्या राघवचे पात्र निखिल दामले साकारत आहे. रमाचे पात्र ऐश्वर्या साकारत आहे.
मालिकेतील या दोघांमधील तिखट नोकझोक आणि खट्याळ भांडण बघायला मिळत आहे. निखिल दामले याबद्दल बोलताना त्याने काही अनुभव सांगितले. तो म्हणाला ,या मालिकेची प्रोसेस खूपच इंटरेस्टिंग होती. मला जेव्हा या भूमिकेची विचारणा झाली तेव्हा त्यात मला अस्खलित श्लोक, पल्लेदार संवाद म्हणायचे होते आणि यावरून मला अंदाज आला की माझे पात्र काय असू शकते. देवा धर्माचे करणारा, आदर्श मुलगा आणि त्यानुसार मी तयारी करायला सुरुवात केली. पहिले मला वाटलं एखादे दोन श्लोक असतील मग होऊन जाईल आरामात करू शकू. लहानपणापासून मला श्लोक म्हणायची सवय आई बाबांमुळे लावली होती.