Join us  

जाणून घ्या आज बिग बॉस मराठीच्या घरात शर्मिष्ठा राऊत आणि मेधा घाडेला का होणार शिक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 7:06 AM

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या बिग बॉस यांनी सोपवलेले “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सुरू आहे. ज्यामध्ये ...

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या बिग बॉस यांनी सोपवलेले “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सुरू आहे. ज्यामध्ये नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा आहेत. नंदकिशोर कार्यामध्ये प्रजेला बरेच टास्क आणि शिक्षा देत आहेत. स्मिता आणि आस्ताद हुकुमशहा नंद किशोर यांचे रक्षक आहेत. टास्क दरम्यान नंदकिशोर यांनी प्रजेला त्यांच्यावर गौरव गीत तसेच जयघोष तयार करायला सांगितले. त्यानंतर प्रजेला त्यांनी कुठली गोष्ट आजवर केली नाही जी त्यांना या घरामध्ये करायची आहे असे विचारल्यास प्रजेने एक एक करून त्या त्या गोष्टी हुकुमशहाला सांगितल्या. आजदेखील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य रंगणार आहे. परंतु काल मेघाला बिग बॉस कडून मिळालेल्या आदेशानुसार आज प्रजा हुकुमशहा विरोधात बंड पुकारणार आहेत.बिग बॉस यांनी हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी हुकुमशहा समोर बंड करण्यासाठी प्रजेला काही टास्क दिले. कारण जेंव्हा प्रजा बंड करते, तेव्हा हुकुमशाही संपुष्टात येते. टास्कनुसार प्रजेने हुकुमशहाच्या किमान पाच पोस्टरवर काळा रंग फासणे, हुकुमशहा यांचा पुतळा नष्ट करणे, हुकुमशहा यांच्या डोक्यावर पाणी ओतणे, हुकुमशहा यांच्या विशेष रूम मध्ये जाऊन स्मोक बॉम्ब फोडणे या गोष्टी करणे अपेक्षित आहे. ज्यामधील आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नंदकिशोर म्हणजेच हुकुमशहाचे घरामध्ये लागलेल्या पोस्टरवर काळा रंग फासताना आस्ताद मेधाला पकडणार आहे. तसेच मेधाकडे असलेली शाई देखील हुकुमशहाचे रक्षक जप्त करणार आहेत. त्यामुळे आता हा टास्क कसा पूर्ण होईल? तसेच मेधा आणि शर्मिष्ठाला आज शिक्षा देखील होणार आहे, ज्यावरून प्रजा आणि हुकुमशहा तसेच त्यांचे रक्षक यांच्यामध्ये बरेच वाद होताना दिसणार आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण प्रजा एकत्र येऊन बंड पुकारणार आहे.सई आणि रेशम मिळून कसा पुतळा नष्ट करतील... स्मोक बॉम्ब कसा फोडतील... सई डोक्यावर पाणी ओतण्यामध्ये यशस्वी होईल का? याची उत्तरे प्रेक्षकांना बिग बॉस मराठीच्या या भागात मिळणार आहेत. Also Read : अस्ताद काळे या अभिनेत्रीसोबत आहे नात्यात, बिग बॉस मराठीमध्ये दिली कबुली