Join us  

​जाणून घ्या कसा आहे ये रिश्ता क्या कहलाता है फेम शिवांगी जोशीचा डाएट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 10:29 AM

‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या लोकप्रिय मालिकेत नायराची भूमिका रंगविणारी शिवांगी जोशी ही आपल्या तब्येतीबद्दल नेहमीच ...

‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या लोकप्रिय मालिकेत नायराची भूमिका रंगविणारी शिवांगी जोशी ही आपल्या तब्येतीबद्दल नेहमीच दक्ष असते. अलीकडे तर तिने या मालिकेच्या सर्व कलाकार आणि कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी शिवांगीने आता केवळ लिक्विड आहाराचा मार्ग पत्करला आहे. शिवांगीची व्यक्तिरेखा अतिशय लोकप्रिय असल्याने ती मालिकेच्या जवळपास प्रत्येक प्रसंगात दिसते. शिवांगीची आई तिच्यासोबत नेहमीच सेटवर उपस्थित असते. तिने आता शिवांगीच्या तब्येतीची सूत्रे हाती घेतली आहेत. शिवांगीच्या शरीरात पुरेसे पाणी जात आहे ना, याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे तिला नेहमीच फळांचा रस, पाणी वगैरे प्यायला लावतात. याबाबत शिवांगी सांगते, “माझी आई माझ्याबरोबर सतत असते आणि ती माझ्या तब्येतीची बारकाईने काळजी घेते, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. आता उन्हाळ्याच्या त्रासापासून माझ्या तब्येतीचा बचाव करण्यासाठी मी केवळ लिक्विड आहार घ्यावा, हे तिनेच सुचवले. त्यामुळे ती आपल्या बरोबर ताज्या फळांचा रस आणि भाज्यांचा रस घेऊन येते आणि दिवसभर मला प्यायला देत असते.”छोट्या पडद्यावर सर्वात जास्त काळ सुरू असणारी मालिका म्हणून 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेनं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. २ जानेवरी २००९ पासून सुरू झालेली ही मालिका गेल्या नऊ वर्षांपासून रसिकांचे अविरत मनोरंजन करत आहे. नुकतेच या मालिकेने अडीच हजार भाग पूर्ण केले आहेत. केवळ सर्वात जास्त काळ सुरू असलेली मालिकाच नाही तर या मालिकेने सातत्याने टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. हा रेकॉर्ड झाल्याने ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेची टीमसुद्धा भलतीच खूश होती. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेला छोट्या पडद्यावर सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेकडून टक्कर मिळत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ट्विस्ट आणि रंजक गोष्टी रसिकांना भावतायत. ये रिश्ता या मालिकेत देखील आता लवकरच रंजक वळण रसिकांना पाहता येणार आहे.Also Read : ‘भूमिकेतून आयुष्य जगणं आवडतं’ - शिवांगी जोशी