Join us  

हे दोघे लागीरं झालं जी या मालिकेतील आहेत कलाकार, ओळखा पाहू कोण आहेत हे दोघे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 1:46 PM

लागीरं झालं जी या मालिकेला प्रेक्षकांचे खूप चांगले प्रेम मिळत असून सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत.

ठळक मुद्देनिखिल चव्हाणने इन्स्टाग्रामवर त्याचा आणि किरणचा खूप जुना फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, किरण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

छोट्या पड्यावरील 'लागीरं झालं जी' मालिका दिवसेंदिवस अधिकाधिक रंजक बनत चालली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल ही जोडी रसिकांना चांगलीच भावते आहे. याशिवाय मालिकेतील इतर कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय झाले आहेत. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी असून त्या त्या व्यक्तिरेखेचं विशेष महत्त्व आहे. अजिंक्यचा मित्र राहुल्या, विक्या, त्याचे मामा-मामी, जिजी, जयडी, भैय्यासाहेब या भूमिका रसिकांमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत. 

लागीरं झालं जी या मालिकेत अजिंक्यच्या भूमिकेत नितीश चव्हाण आहे तर शितलीच्या भूमिकेत शिवानी बावकर असून या मालिकेमुळे त्या दोघांना खूप चांगली लोकप्रियता मिळाली. या मालिकेत विक्रम फौजी म्हणजेच विक्याच्या भूमिकेत निखिल चव्हाण दिसला होता तर या मालिकेत 'भैय्यासाहेब' उर्फ 'हर्षवर्धन देशमुख' ही भूमिका किरण गायकवाड साकारत आहे. या दोघांनाही या मालिकेमुळे प्रेक्षकांचे खूप चांगले प्रेम मिळाले. तुम्हाला माहीत आहे का, ते दोघे खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. ते दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. किरणचा नुकताच वाढदिवस झाला असून त्याला निखिलने एका हटके अंदाजात सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. 

निखिल चव्हाणने इन्स्टाग्रामवर त्याचा आणि किरणचा खूप जुना फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, किरण शेठ जसं तुम्ही म्हणालात एकांकिकेची पहिली नांदी ते चांदवडीची फांदी आपण एकत्र आहोत... तसंच आपला हा फोटो बरंच काही सांगून जात आहे. २०११ पासून तुम्ही माझ्या प्रत्येक सुखात आणि दुःखात असे सहभागी असता जणू काय ते तुमचंच सुख किंवा दुःख आहे....असेच तुमचे येणारे सगळे वाढदिवस मला साजरे करायला मिळो.... किरण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. निखिलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो प्रचंड जुना आहे. या फोटोत निखिल आणि किरण दोघांना ओळखणे देखील कठीण जात आहे. 

टॅग्स :लागिरं झालं जीनिखील चव्हाणझी मराठी