Join us  

लागीरं झालं जी या मालिकेतील जयश्री म्हणजेच किरण ढाने खऱ्या आयुष्यात आहे एकदम ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2017 5:30 AM

छोट्या पडद्यावर सध्या लागीरं झालं जी ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेचे दिवसेंदिवस रंजक होत चाललेले कथानक ...

छोट्या पडद्यावर सध्या लागीरं झालं जी ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेचे दिवसेंदिवस रंजक होत चाललेले कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे अल्पावधीत मालिका लोकप्रिय ठरली आहे. फौजींच्या जीवनावरील आधारित या मालिकेत अज्या म्हणजेच अजिंक्य आणि शीतली अर्थात शीतलची लव्हस्टोरीही रसिकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत आता अज्या आणि शीतलीची प्रेमकथा फुलू लागलीय. अजिंक्य आणि शीतल रसिकांच्या घराघरात लोकप्रिय झाले आहेत. शीतल ही भूमिका अभिनेत्री शिवानी बोरकर हिने साकारली आहे. तर अजिंक्यची भूमिका नितीश चव्हाण याने साकारली आहे. मालिकेत अजिंक्य लष्करात दाखल होण्यासाठी मेहनत करत आहे. एखाद्या खऱ्याखुऱ्या फौजीला रिअलमध्ये जी मेहनत करावी लागते तशीच मेहनत तो आपल्या फिटनेसवर घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कपाळावर चंद्रकोर, आकर्षक शरीरयष्टी यामुळे अजिंक्यचा लूक ऑनस्क्रीन लूक रसिकांमध्ये विशेषतः तरुणींमध्ये हिट ठरत आहे. Also Read : 'लागीर झालं जी' मालिकेतील अजिंक्यच्या ‘मामी’चा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला? खाली कमेंट देऊन कळवालागीरं झालं जी या मालिकेत किरण ढाने प्रेक्षकांना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. किरण या मालिकेत जयश्री म्हणजेच जयडीची भूमिका साकारत आहे. लागीरं झालं जी या मालिकेत बहुतेक सर्व कलाकार याच भागातले स्थानिक कलाकार आहेत. किरण देखील साताऱ्यात राहाणारी आहे. ती तेथील कॉलेजमधून शिक्षण घेत आहे. या मालिकेत अगदी साधी भोळी दिसणारी किरण ही तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. ती लागीरं झालं जी या मालिकेत नेहमीच पंजाबी ड्रेसमध्ये पाहायला मिळते. तसेच या मालिकेत ती केसांची वेणी घालते. पण खऱ्या आयुष्यात ती वेस्टर्न कपडे घालते तसेच अनेक वेळा तिचे केस मोकळलेच असतात. किरण तिच्या जयश्री या व्यक्तिरेखेपेक्षा खऱ्या आयुष्यात खूपच वेगळी दिसते. त्यामुळे खऱ्या आयुष्यात किरण तुमच्यासमोर आली तर तुम्ही नक्कीच तिला ओळखू शकणार नाही याची आम्हाला खात्री आहे. लागिरं झालं जी या मालिकेने छोट्या पडद्यावर एंट्री करताच अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. पहिल्या एपिसोडपासून सुरू झालेला या मालिकेचा छोट्या पडद्यावरचा प्रवास आता बघता बघता 100 एपिसोडपर्यंत येऊन पोहचला आहे.