लाडो - वीरपूर की मर्दानीमध्ये ट्वीस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 10:15 IST
सिद्धार्थ अरोरा कलर्सच्या लाडो - वीरपूर की मर्दानी मधील नाट्य मसालेदार करणार कलर्सचे लोकप्रिय सामाजिक नाट्य लाडो - वीरपूर ...
लाडो - वीरपूर की मर्दानीमध्ये ट्वीस्ट
सिद्धार्थ अरोरा कलर्सच्या लाडो - वीरपूर की मर्दानी मधील नाट्य मसालेदार करणार कलर्सचे लोकप्रिय सामाजिक नाट्य लाडो - वीरपूर की मर्दानी ने अनुष्काच्या जीवनातील नवीन कलाटण्यांनी प्रेक्षकांना त्यांच्या टिव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले आहे. नुकत्याच झालेल्या भागात पाहिले की अनुष्का सेठी कुटुंबात जाऊन पोहोचली आहे जे तिच्यावर प्रेम करतात आणि तिचे एका राजकुमारी सारखे लाड करतात. शोने आता झेप घेतली असून नासिर खान, मानिनी डे, फरीदा दादी आणि चारू अशोपा हे निष्णात कलाकार अनुष्काच्या जीवनात महत्वाच्या भूमिका निभावताना दिसणार आहेत. आणि आता शोच्या अगदी ताज्या भागात अभिनेता सिद्धार्थ अरोरा येत आहे ज्याने अनेक शों मधून प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. तो जुहीच्या बालपणाच्या मित्राची, शौर्यची भूमिका साकारणार आहे आणि अनुष्काच्या जीवनात नवीन कलाटण्या आणणार आहे. शो मध्ये सहभागी होण्याची उत्सुकता दाखवत सिद्धार्थ अरोराने सांगीतले, “कलर्स सोबतचा हा तिसरा शो असल्यामुळे मला घरी आल्यासारखेच वाटत आहे. प्रत्येक अभिनेत्याला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असते जेव्हा तो एखादी भूमिका स्विकारतो. आणि माझ्यासाठी शौर्यची भूमिका ही सर्वच दृष्टीने चांगली आहे कारण तो एक प्रेमवेडा आहे जो बालपणीचे प्रेम जुहीसाठी थांबलेला आहे, एक असे पात्र जे मी याआधी कधीही साकारलेले नाही. शौर्यची भूमिका ही अतिशय रोमांचित करणारी असून त्यात वेगवेगळ्या छटा असलेल्या अनेक भावनांचा समावेश आहे. त्यामुळे मला नवीन मार्ग सुद्धा शोधता येतील आणि माझ्यातील अभिनेत्याला अजून धार चढेल. तसेच, मी अविका गोर सोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे आणि एका समृद्ध करणाऱ्या अनुभवाच्या प्रतिक्षेत आहे.” बालपणीचे मित्र असलेले शौर्य आणि जुही अविभक्त होते पण त्यांच्या कुटुंबातील वैरामुळे ते दोघे वेगळे झाले. अनेक वर्षे उलटून गेल्या वर सुद्धा शौर्य त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीला विसरू शकला नाही आणि तो तिचा शोध घेत राहिला. पण, एक दिवस त्याच्या प्रार्थनेला यश आले आणि त्याचे जीवन असलेली जुही त्याला पुन्हा मिळाली, पण तो अनुष्कासाठी एक धक्का होता.