Join us  

‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’मालिकेत या कारणामुळे होणार 'त्या' पाच मुलींची एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 12:40 PM

चंचल, धैर्या, बुध्दी, शक्ती आणि सुरिली नावाच्या या पाच मुलींच्या भूमिका अनुक्रमे रिध्दिमा तनेजा, आर्णा भदोरिया, सेजल गुप्ता, ऐर्स्ता मेहता आणि अयात शेख या मुली रंगवीत आहेत. 

कुंतीच्या लालसेमुळे निर्माण होणार्‍्या विनोदी प्रसंगांमुळे  ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती. मालिकेतील रंजक वळणामुळे  रसिकांनीही मालिकेला पसंती दर्शवली. श्रीयुत पांचाळ (मणिंदरसिंग) आणि कुंतीदेवी या मुख्य व्यक्तिरेखांभोवती मालिकेची कथा गुंफण्यात आली असून त्यात पांचाळ यांच्या प्रार्थना (आस्था अगरवाल), परी (ओजस्वी अरोरा), प्रतिभा (धरती भट), पंजिरी (राधिका मुथुकुमार) आणि प्रेमा (पत्राली चटोपाध्याय) या पाच पत्नींचाही समावेश आहे. आता या मालिकेचा दुसरा टप्पा सुरू होत असून त्यात कुंतीने भगवान शिवजींकडे असे कोणते मागणे मागितले आहे की ज्यामुळे मालिकेत पाच छोट्या मुलींचा प्रवेश होणार आहे? चंचल, धैर्या, बुध्दी, शक्ती आणि सुरिली नावाच्या या पाच मुलींच्या भूमिका अनुक्रमे रिध्दिमा तनेजा, आर्णा भदोरिया, सेजल गुप्ता, ऐर्स्ता मेहता आणि अयात शेख या मुली रंगवीत आहेत. 

त्यांच्या आगमनाने कुंतीनिवास गजबजून गेले आहे. त्यांच्या आगमनामुळे कन्हैय्या आणि पाचही सुनांच्या जीवनात पालकत्वाने प्रवेश केला आहे. पण पालकत्त्वाची जबाबदारी कन्हैय्या आणि त्याच्या पाच पत्नी स्वीकारण्यास तयार आहेत का? या नव्या घडामोडींवर कन्हैय्याची भूमिका रंगविणारा अभिनेता मणिंदरसिंग म्हणाला, “कन्हैय्या हा नेहमीच एक जबाबदार मुलगा, पती आणि भाऊ राहिला आहे. सर्वजण एकत्र आणि आनंदी राहतील, याची त्याने पुरेपूर दक्षता घेतलेली असते. आता त्याच्या जीवनात पितृत्त्वाचा नवा टप्पा प्रारंभ होत आहे. हा प्रवास म्हणजे नवी घसरगुंडी असेल आणि त्यावरील करामती प्रेक्षकांना हसवत ठेवतील, यात शंका नाही.”

आता या मालिकेच्या कथानकाचा काळ भविष्यात पुढे नेला जणार आहे. त्यानंतर मालिकेत मणिंदरच्या पाच मुलांचा समावेश होईल. इतकेच नव्हे, तर विनोदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांचाही या मालिकेत प्रवेश होणार आहे. इंदिरा म्हणाल्या, “मी प्रथमच विनोदी मालिकेत भूमिका रंगवीत असून त्याबद्दल मी खूपच उत्सुक बनले आहे. वास्तव जीवनात मी तशी विनोदी बुध्दी असलेली आहे; पण प्रेक्षकांनी माझी विनोदी अभिनयाची शैली अजून पाहिलेली नाही. आता या मालिकेतील भूमिकेद्वारे मी प्रेक्षकांना माझ्यातील विनोदी अभिनयाचे अंग दाखवू शकेन, याचा मला आनंद होत आहे.” या मालिकेत इंदिरा कृष्णन या मणिंदरची आत्याबाईच्या भूमिकेत आहेत. ही आत्या स्वभावाने कडक असते आणि तिला फाजिलपणा अजिबात खपत नाही. प्रेक्षकांना ही भूमिका नक्कीच पसंत पडेल.

टॅग्स :क्या हाल, मिस्टर पांचाळ