Join us  

कुशल टंडनच्या 'बेबाकी'ची होतेय चर्चा, दिसणार प्रियकराच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 7:41 PM

कुशल टंडनची नवीन सीरिज बेबाकीची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.

असे म्हणतात की, प्रेमात वेडेपणा नसेल, तर ते प्रेम कसले! प्रेम जेव्हा कोणत्याही संस्कारांपासून मुक्त आपल्या सर्वांत निखळ स्वरूपात असते आणि कोणतेही नियम मानत नाही तेव्हा स्वच्छंदी आणि मनमोकळे असते. तशीच प्रेमकथा असलेली सीरिज बेबाकी ऑल्ट बालाजी झी 5 प्लॅटफॉर्मवर घेऊन आली आहे. यात कुशल टंडन प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहे.  बेबाकी ही गोष्ट आहे सुफीयान अब्दुल्ला आणि कैनात सहानी या दोन पूर्णपणे विरुद्ध आणि तेवढ्याच कणखर व हट्टी व्यक्तिरेखांची. शिमल्याच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा दोन परस्परविरोधी व्यक्तिरेखांच्या आयुष्यांभोवती फिरणारी आहे. या दोन भूमिका कुशल टंडन आणि शिवज्योती राजपूत यांनी केल्या आहेत. सगळे काही सरळ मार्गाने चालले असतानाच सुफीयानचा मित्र इम्तियाज (करण जोतवानी) याच्या प्रवेशामुळे त्यांच्या आयुष्यांमध्ये एक अनपेक्षित वळण लागते. या तिघांमधील नातेसंबंध खूपच विचित्र वाटेवर जातात. या अफलातून त्रिकुटासोबत मालिकेत प्रतीक सहजपाल, इशान धवन, माहिर पांधी, सलोनी व्होरा, अदिती वत्स, जुहैना अहसाल असे अनेक कलावंत आहेत. शिवाय, कृतिका देसाई, सुचित्रा पिल्लई, अनन्या खरे, मोहित चौहान, समीर मल्होत्रा, इंद्रनील भट्टाचार्य यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

 बेबाकी मालिकेत उत्तम गाणीही आहेत. चित्रपटसृष्टीतील प्रख्यात संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली व गायकांनी गायलेली गाणी यात आहेत. अखिल सचदेव आणि असीस कौर यांनी अत्यंत सुरात गायलेल्या ‘गलीयां’ या गाण्याने तर यापूर्वीच प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. भावनांचा उत्तम समतोल या गाण्यात आहे. गौरव गुलेरियाने गुणगुणलेला ‘इंतेहाँ’ हा आणखी एक साउंडट्रॅक प्रसिद्ध झाला आहे. याशिवाय प्रसिद्ध पार्श्वगायक रिचा शर्मा व दिग्विजय सिंग परियार यांनी गायलेले ‘रब्बा खेर करी’ हे सुंदर गाणे प्रत्येक व्यक्तीच्या मनात तिच्या प्रेमाच्या व्यक्तीबद्दल शुभेच्छा दाटून आणणारे आहे.  

या मालिकेबद्दल कुशल टंडन म्हणाला की, माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि मला माझे सर्वोत्तम काम करण्यासाठी उत्तेजन दिल्याबद्दल मी एकता मॅमचे नेहमीच आभार मानत आलो आहे.  मला आठवते की, केवळ एका फोन कॉलवर त्यांनी मला सुफियानची व्यक्तिरेखा करण्यासाठी विचारले आणि मी तयार झालो. माझ्यात आणि सुफियानमध्ये खूप साम्य आहेत. त्यामुळे व्यक्तिरेखेमध्ये शिरणे आणि ती परिपूर्णतेने निभावणे खूपच सोपे झाले.”

टॅग्स :एकता कपूर